पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १६९] खीस्ताचे आकाशांत जाणे. ३२९ दिला आहे; ह्मणून तुह्मी जाऊन सर्व देशांतील लोकांस शिष्य करा; त्यांस बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या*). म्या ज्या आज्ञा तुह्मास दिल्या त्या सर्व पाळायास यांस शिकवा, आणि पाहा, कालाच्या समाप्तीपर्यंत मी तुह्माबरोबर सर्वदां आहे. जो विश्वास धरील व बाप्तिस्मा घेईल त्याचे तारण होईल; पण जो विश्वास धरणार नाहीं तो अन्यायी ठरेल." तेव्हां त्यांनी शास्त्र समजावे ह्मणून त्याने त्यांचे मन उघडिले आणि त्यांस मटले: “असे लिहिले आहे व असे अगत्यही होते की, खीस्ताने सोसावे आणि तिस-या दिवसीं मेलेल्यांतून उठावे आणि यरूशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांस पश्चात्ताप व पापांची क्षमा त्याच्या नामाने गाजविण्यांत यावी. या गोष्टींचे साक्षी तुह्मी आहां, आणि पाहा. मी आपल्या बापाचे वचन तुह्मावर पाठवितों, पण तुमी वरून सामर्थ्य अंगी ल्याल तोपर्यंत यरूशलेम नगरांत राहा."-याप्रमाणे तो सोसल्यानंतर आपण जिवंत झालो हे बहुत प्रमाणांनी आपल्या शिष्यांस दाखवून ४० दिवसपर्यंत त्यांस दिसत असे, आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी बोलत असे.

  • ) बाप व पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नामाने वापिस्मा पावणे म्हणजे त्रैक जो देव

याचा संबंधी होणे, आणि तारणाची जी संपत्ति त्याने पर्वकाळी योजिली व सिद्धही केली आहे. तिचा विभागीहोणे असे आहे. देवाच्या राज्यांत जाण्याकरितां पाणी व आत्मा यांपासन आपला नवा जन्म झाला पाहिजे. आणि मग जें आत्म्यापासन जन्मलें तें आत्मा आहे (पक० ११३ क० १).-जर्से स्वाभाविक जन्माकडून आदामाचे पाप व दंड यांचा बांटा आपणांस मिळाला, तसे पाण्यापासून व आत्म्यापासन जो पुनर्जन्म त्याच्या योगाने आपणांस खीस्तानी पवित्रता व न्यायीपण प्राप्त होते. आपण खीस्ताच्या शरिरातले अवयव, देवाची लेकरें, आणि सर्वकाळच्या जीवनाचे वतनदार असे होतो, परंतु जो नवा माणस आपणामध्ये जन्मला, त्याचे निरंतर पालन पोषण व शिक्षा इत्यादि झाली पाहि- तती होण्यास शास्त्रातील देवाचे वचन व प्रभुभोजन ही साहित्ये आहेत. ही जर नाहीत तर आपल्यागयीं जें आन्मिक जीवन ते अशक्त होऊन शेवरी त्याचा क्षय होतो. प्रक० १६६, खीस्ताचे आकाशांत जाणे. (लूका २४. प्रेषि० १.) आणि प्रभु आपल्या शिष्यांस बेथानी पावेतो बाहेर घेऊन गेला, तेव्हा त्याने आपले हात वर करून त्यांस आशीर्वाद दिला. आणि असे झाले की. 421