पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५. KINED प्रक० ७] पालेस्टेन देश दुसरा भाग. इस्राएलांच्यापूर्वजांचा इतिहास. पालेस्टैन देश, प्रक० ७. १. असद्धर्मी राष्ट्रांस देवाने त्यांच्या त्यांच्या मार्गाने चालू दिले. (प्रेषि०१४,१६). तरी त्यांचे पूर्वी नेमलेले समय व त्यांच्या वस्तींच्या सीमा त्याने अशा नेमून ठेविल्या आहेत की, त्यांनी प्रभूचा शोध करावा, कदा- चित् त्यांनी चापसत तरी त्याला मिळवून घ्यावे (प्रेषि०१७,२६.२७). ता- रणाची योजना सिद्धीस नेण्याकरितां देवाने एका माणसाला निवडून घेतले. आणि त्याच्या संततींतून सर्व राष्ट्रांकरितां तारण यावे. त्या निव- डून घेतलेल्या लोकांसाठी देवाने देशही निवडून घेतला, ह्मणजे ज्या देशांमध्ये ते दुसऱ्या राष्ट्रांपासून वेगळे राहतील आणि ज्यामध्ये त्यांची वृद्धि होऊन ते ईश्वरी ज्ञानसंपन्न होतील असाच देश त्याने निवडून घेतला, आणि तो देश पालेस्टैन देश आहे. त्यावेळेस तर कनानाची संतती त्यांत राहत होती. पालेस्टैन याची पश्चिम सीमा भूमध्यसमुद्र, उत्तरेस लबानोन डोंगराची रांग, पूर्वेस सुर्यादेशाचा ओसाड प्रदेश आणि दक्षिणेस अरबस्थानांतील रेतीचे मैदान असी आहे. यावरून असे दिसन येते की, जसे एखादें बेट चोहीकडून पाण्याने वेष्टिले असल्या- मुळे त्यांतील राहाणाऱ्यांस एकांतवास असतो, तसाच पालेस्टैन देश होता. तरी आशिआ, युरोप आणि आफ्रिका ह्या खंडांत त्यावेळेस वसाहत असन ती तीनच खंडे त्यास लगत असल्यामुळे तो देश पृथ्वीवरील सर्व देशांहून दे- वाच्या सूत्रासाठी अधिक सोईचा झाला. तारणाची तयारी होण्याच्या दिवसांत देवाच्या राज्यास संरक्षणार्थ पाळणा असा तो देश होता. आणि तारणाची सिद्धता झाल्यानंतर त्याविषयींचे शुभवर्तमान सर्व देशांतील लोकांस लौकर प्राप्त व्हावे, ह्मणून पालेस्टैन तीन खंडांचा गर्भ असल्या- मुळे अतिशय सोईचा होता,