पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १६५] एम्माउ गांवांतील दोघा शिष्यांस येशूचे दर्शन. ३२५ होतां त्या कोणत्या?" मग क्लयपा नामें एकाने त्याला उत्तर दिले की: "तूं यरूशलेमांत प्रवासी असता त्यांत या दिवसांमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या तला एकट्यालाच ठाऊक नाहीत काय?" तो त्यांस म्हणाला "कोणत्या?" त्यांनी म्हटले: “येशू नाजरेथकर याविषयींच्या; तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर करण्यांत व बोलण्यांत पराक्रमी भविष्यवादी झाला. त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी मरणासाठी पराधीन करून खांबी दिले. पण जो इस्त्राएलाची खंडणी करणारा तो हाच आहे असी आम्ही आशा धरीत होतो; आणखी या अवध्यांशिवाय या गोष्टी घडून आज तिसरा दिवस चालला आहे. आणखी आमच्यांतील कित्येक बायकांनी आम्हास थक केले. त्या मोठ्या पहाटेस थड्याकडे गेल्यावर त्याचे शरीर त्यांस मिळाले नाही, आणि त्यांनी येऊन मांगितले"दूतांचे दर्शन आम्हास झाले,ते तो जिवंत आहे असे बोलले." 7 आमच्या बरोबरच्या माणसांतील कित्येक थड्याकडे गेल्यावर बायकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांसही अढळले, पण त्याला त्यांनी पाहिले नाही." मग येशू त्यांस म्हणालाः "अहो निर्बुद्धि आणि भविष्यवाद्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्वांवर विश्वास धरण्यास मतिमंद हो!खीस्ताने ही सखे सोसून आपल्या वैभवांत जावे याचे अगत्य नव्हते काय?" मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांपासून आरंभ करून सर्व शास्त्रांतील आपल्या विषयींच्या गोष्टी त्यांस समाजविल्या. आणि ज्या गांवास ते जात होते त्याजवळ आले, तेव्हां त्याने पुढे जाण्याचा रोख दाखविला: परंत ते त्याला आग्रह करून म्हणाले: “आमच्या संगतीं राहा, कारण सांज जवळ आहे व दिवस उतरला आहे." मग तो त्यांसंगतीं राहयास आंत गेला आणि तो त्यांबरोबर जेवायास बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद मागितला व मोडून त्यांस दिली. आणि त्यांचे डोळे मोकळे झाले आणि त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांस अदश्य बाला आणि ते एकमेकांस ह्मणाले : "तो वाटेत आह्मासीं बोलत होता आणि आह्मासाठी शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हां आमचे करण आमामध्ये जळत होते की नाही?" तेव्हां त्याच घटकेस ठन यरूशलेमास माघारे गेले आणि अकरा जण एकत्र मिळालेली म आढळली आणि सांगू लागली की: "प्रभू उठला आहे खरा आणि