पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२४ एम्माउ गांवातील दोघा शिष्यांस येशूचे दर्शन, [प्रक० १६५ कोठे ठेवले, हे मला ठाऊक नाही." असे बोलून ती पाठमोरी फिरली आणि येशूला उभे राहिलेले तिने पाहिले, परंतु तो येशू आहे असे तिला समजले नाही. येशूने तिला मटले “बाई, कां रडतीस?" कोणाचा शोध करतीस?" तो माळी आहे असे समजून ती त्याला ह्मणालीः "दादा, खा त्याला एथून नेले असले तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, मणजे मी त्याला घेऊन जाईन." येशूने तिला ह्मटले. "मारये!" ती मुरडून त्याला ह्मणालीः "राब्बुनी!" ह्मणजे हे गुरू. येशूने तिला पटले: “मला हात लावू नको, कारण मी आपल्या बापाकडे अजून चढलो नाहीं *), तर माझ्या भावांकडे जाऊन त्यांस सांग की, जो माझा बाप व तुमचा बाप आणि माझा देव व तुमचा देव त्याकडे मी चढतो."

  • ) “मला हात लावू नको" (मला धरूं नको) म्हणजे मला धरून विलंब करूं

नको. कारण माझ्या बापाकडे जाउन मला आपले कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुला फिरून सोडावे लागेल;-आपले काम सिद्धीस नेऊन मी आपल्या बापाकडे वर चढल्यानंतर काळाच्या समाप्तिपर्यंत तुझाबरोबर सर्वकाळ राहीन (माथी २८.२०). तेव्हां तो समय मला न सोडता माझे पाय धरायास तुम्हासाठी योग्य आहे, हा येशूचा भावार्थ होता. २. आणि त्याच्या शिष्यांस हे वर्तमान सांगायास त्या दुसऱ्या बायका थड्यापासून धांवत जात असतां, पाहायेशू त्यांस भेटला व ह्मणालाः "सलाम." मग त्यांनी त्याला नमन केले. तेव्हां येशूने त्यांस मटले: “भिऊ नका,जा, माझ्या भावांस सांगा की, गालिलांत जा ह्मणजे तेथे मला पाहाल." मग त्यांनी अकरा जणांस व वरकड सर्वांस त्या अवघ्या गोष्टी सांगितल्या. परंतु त्या त्यांस गप्प अशा वाटल्या व त्यांवर ते विश्वासले नाहीत.- त्यानंतर येशू त्याच दिवसी केफा (पेतर) यालाही दिसला (१ करिं० १५,५). प्रक० १६६. एम्माउ गांवांतील दोषा शिष्यांस येशूचे दर्शन. (मार्क १६. लूका २४.) त्याच दिवसीं त्यांतील दोघे जण येरूशलेमाजवळील एम्माउ नामें गांवास जात होते. आणि त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी ते संभाषण करीत असतां येशू स्वतां जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालला. पण त्यांनी त्याला ओळखू नये ह्मणून त्यांचे डोळे आकळले होते. त्याने त्यांस मटले: “तुमी चालतांना ज्या गोष्टी एकमेकांसी काढून उदासमुख