पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२० येशूला थडग्यांत ठेवणे. प्रक० १६२ योगाने आमचा अपराध नाहीसा होतो. देव आमच्या पापांची क्षमा करून पापाच्या शासनापासून आम्हास मुक्त करितो आणि आरास न्यायी ठरवून प्रिय मानितो. तसे आह्मी आपल्या पुण्याने नव्हे, तर “देवा- च्या कृपेने खीस्त येशूकडून जी खंडणी तिच्या योगाने फुकटवारी न्यायी ठरतो" (रोम० ३,२४.) न्यायी ठरणे हे केवळ विश्वासाकडून आहे, हा सिद्धांत शुभवर्तमानाचा झेंडा उभारणाऱ्या ख्रिस्ती मंड- ळीच्या सर्व सिद्धांताचा पाया आहे, प्रक० १८2. येशूला थडग्यांत ठेवणे, ( मात्थी २७. मार्क १५. लूका २३. योह० १९.) १. तो दिवस तर तयार करण्याचा दिवस (शाब्बाथाच्या पूर्वीचा दिवस) होता. यास्तव शाब्बथ दिवसी त्यांची शरिरें खांबावर राहूं नयेत ह्मणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांस न्यावे असे यहूद्यांनी पिलाताजवळ मागि तले. यावरून शिपायांनी येऊन त्याबरोबर खांबी दिलेल्या पहिल्याचे व दुस-याचे पाय मोडले. पण येशूकडे येऊन तो मेलाच आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुसीत भाला भोसकला, तेव्हांच रक्त व पाणी निघाले. "त्याचे हाड मोड- णार नाहीं" *) असा जो शास्त्रलेख, तो पूर्ण व्हावा ह्मणून असे झाले. आणि दुसराही शास्त्रलेख असा आहे की: "ज्यांनी त्याला भोसकले त्याकडे ते पाहतील." जख०१२, २०. 17*) वहाँउण कोंकराचे मूळरूप खीस्त होय जुन्या करारांत प्रतिरूपी सांगितलेले में वल्हांडण कॉकरूं, त्याचेही हाउ मोडायाचे नव्हते. २. मग संध्याकाळ झाल्यावर आरिमथईतील योसेफ नामें एक धन- वान माणूस आला. तो न्यायसभेतील नामांकित सभासद व चांगला व नीतिमान होता, आणि तो स्वतां देवाच्या राज्याची वाट पाहत होता. त्याने त्यांच्या बेताला व कामाला सम्मत दिले नव्हते. त्याने धैर्य धरून आंत पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पण तो इतक्यांत मेला याविषयीं पिलाताला आश्चर्य वाटले, परंतु हे शतपतीकडून समज- ल्यावर त्याने योसेफाला शरीर दिले. नंतर तो तागाचे वस्त्र विकत घेऊन आला आणि त्याला खांबावरून काढले. आणि जो निकदेम