पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१८ येशूचा मृत्यु. प्रक० १६१ थट्टा केली. अणखी त्या अपराध्यांतील एकाने त्याची निंदा करून झटले तूं खीस्त असलास तर आपणाला व आह्मासही तार.” पण दुसऱ्याने उत्तर देऊन त्याला असे धमकावले की: "तूं याच दंडांत असतां देवाचे भय अगदी धरीत नाहींस काय? आह्मी तर न्यायाने सोसतो, कारण आह्मी जे केले त्याचे योग्य फळ भोगतो, परंतु याने काही अयोग्य केले नाही." मग तो येशूला ह्मणालाः “प्रभू, तूं आपल्या राज्यांत येसील तेव्हां माझी अठवण कर." तेव्हां येशूने त्याला झटलेः (२) " मी तुला खचीत सांगतो, तूं आज माझ्या संगतीं स्वर्गात अससील!" .).

  • ) सार्वभौम राजा व जगाचा न्यायाधीश होण्याकरिता तारणान्याला भासनावर भारद

व्हायाचे होते, पण त्यापूर्वी त्याला खांबावर उंच होणे होते. तो न्याय करायास पुन्हा येईल तेव्हा जे तारण पावलेले ते त्याच्या उजवीकडे आणि नाश पावणारे त्याच्या उरावीकडे उभे राहतील. त्याप्रमाणे एथें त्याच्या एकीकडे जो पश्चात्तापरहित अपराधी तो नाश पावणाऱ्यांची प्रतिमा आहे, आणि येशूला शरणागत आलेला जो दुसरा तो उद्धार पावणान्यांची प्रतिमा आहे. या २. येशूच्या खांबाजवळ तर त्याची आई, त्याची मावसी आणि मारया माग्दालीणी ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती (योहान्न ) त्याला जवळ उभे राहिलेलें पाहून आपल्या आईला झटले: (३) “बाई, पाहा तुझा पुत्र!" नंतर शिष्याला मटले: "पाहा, तुझी आई!" आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने आपल्या घरांत तिला घेतले. तेव्हां दोन प्रहरांपासून तिसऱ्या प्रहरा- पर्यंत सूर्य अंधक होऊन सर्व देशावर अंधार झाला. आणि सुमारे तिसऱ्या प्रहरी येश मोठ्याने ओरडत बोललाः ( ४ ) "एली एली! लमा शबाखथानी!" ह्मणजे, "माझ्या देवा, माझ्या देवा, खा मला कां टाकन दिले ?" (गीत २२.प्रक०६९क०५पाहा). तेव्हां जे तेथे उभे होते त्यांतील कित्येकांनी हे ऐकून मटले की, "तो एलियाला बोलावितो." त्यानंतर सर्व गोष्टी आतां पूर्ण झाल्या हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा ह्मणून मटले. (५) "मला ताहान लागली!" तेथे तर भांडे आंबेने भरून ठेवले होते. तेव्हांच त्यांतून एकाने धांवत जाऊन स्पंज घेतले आणि आंबेने भरून व वेतावर घालून त्याच्या तोडासी लावले आणि त्याला प्यायास दिले. परंतु वरकड ह्मणाले: “असूं दे, एलिया याला खाली काढायास