पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१६ येशूला खांबी देणे. [प्रक० १६० यांस ह्मणालाः "तुह्मी त्याला घेऊन खांबी द्या, कारण मला त्याकडे दोष सांपडत नाहीं." यहूद्यांनी त्याला उत्तर दिले की “आह्मास शास्त्र आहे आणि त्याप्रमाणे त्याला मरावे लागते, कांकी त्याने आपणाला देवाचा पुत्र ह्मणविले आहे; त्वा याला सोडले, तर कैसराचा मित्र नाहींस, कारण जो कोणी आपणाला राजा ह्मणवितो, तो कैसराविरुद्ध बोलतो." मग ही गोष्ट ऐकून पिलाताने येशला बाहेर आणले आणि न्यायासनावर बसून त्याने यहूद्यांस मटलेः “पाहा तुमचा राजा!' पण ते ओरडले" त्याला ने, ने, खांबी दे!" पिलात त्यांस ह्मणालाः “तुमच्या राजाला खांबी देऊ काय?" मुख्य याजकांनी उत्तर दिले की: "कैसरावांचून आमास राजा नाही." मग त्याने त्याला खांबी देण्याकरितां त्यांच्या स्वाधीन केलें. प्रक० १६०. येशूला खांबों देणे, ( मात्थी २६. मार्क १५. लूका २३. योह० १९.) १. मग येशूची थट्टा केल्यावर शिपायांनी तो किरमिजी झगा त्याच्या अंगांतून काढला व त्याची वस्त्रे त्याच्या अंगांत घातली, आणि त्याला खांबी देण्याकरितां नेले. तेव्हां इब्री भाषेत गल्गथा ह्मणजे कवंटीची ह्मटलेली जागा, तेथे तो आपला खांब वाहत बाहेर गेला. आणि ते त्याला नेत होते, तेव्हां कोणी एक शिमोन कुरेनेकर रानांतून येत असतां त्यांनी त्याला धरून त्याने येशूच्या मागे खांब वाहवा ह्मणून त्याजवर तो दिला. आणि लोकांचा व बायकांचा मोठा समुदाय त्याच्या मागे चालला, त्यासाठी त्या बडवून घेऊन शोक करीत होत्या. मग येशू त्यांकडे मुर- डून बोललाः “यरूशलेमांतील कन्याहो, मजसाठी रडू नका, तर आप- णांसाठी व आपल्या लेकरांसाठी रडा. कांतर असे दिवस येत आहेत की यांत डोगरांस ह्मणू लागतील आह्मावर पडा! व टेकड्यांस ह्मणतील आह्मास झांका! कांकी ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यास काय होईल." आणि त्याच्या बरोबर मारण्यासाठी दुसरे दोन अपराधीही नेले. आणि गल्गथा नामे जागा एथें आले तेव्हा त्यांनी बोळ मिसळलेला द्राक्षा- रस *) त्याला प्यायास दिला, पण तो चाखल्यावर तो पिईना. तेव्हां त्यांनी तथे त्याला व त्या अपराध्यांस एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे आणि येशूला मध्ये असे खांबी दिले. तेव्हां “तो अपराध्यांसी मोजलेला