पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५९] येशूचे शिक्षानिरूपण. पराधीन केले, हे त्याला ठाऊक होते. आणि तो न्यायासनावर बसला असतां त्याच्या बायकोने त्याजकडे सांगून पाठविले की, तुजसीं व त्या नीतिमानासी काही संबंध नसावा, कारण आज म्या स्वप्नांत त्याकरिता फार सोसले आहे."- तर बाराब्बाला मागावे व येशूचा घात करावा, माणन मुख्य याजक व वडील यांनी समुदायांस समजाविले. सुभेदाराने तर यांस उत्तर दिले: “म्या तुह्माकरितां या दोघांतून कोणत्याला सोडावे ह्मणून मागतां?" तेव्हां सर्व एकदांच ओरडत बोलले: “ याला काढन टाक, बाराब्बाला आमासाठी सोड.” पिलाताने मटले: “तर ख्रीस्त झटलेला येशू याला म्या काय करावे!" ते ओरडत बोलले: "त्याला खांबी दे, खांची दे!" मग तो तिस-याने त्यांस बोललाः "कां? त्याने काय वाईट केले आहे ? त्याकडे मरणास योग्य कांहीं दोष मला सांपडला नाही, अणन मी त्याला शिक्षा करून सोडीन.” परंतु ते फार आग्रह करून "याला खांबी द्यावें" ह्मणून मोठ्याने मागत होते. २. मग आपले कांहींच चालत नाहीं, केवळ अधिकच गडबड होत आहे. हे पाहून पिलाताने पाणी घेऊन समुदाया देखतांआपले हात धुऊन लें“या नीतिमानाच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे, तुमीच पाहा." तेव्हां सर्व लोकांनी उत्तर दिले: "त्याचे रक्त आह्मावर व आमच्या लेकरांवर असो." तेव्हां पिलाताने समुदायाला खुशी करावे, या हेतूने येशूला फटके मारून खांबी देण्याकरितां साधीन केले. तेव्हां सुभेदाराच्या शिपायांनी. येशला कचेरीत नेऊन सगळे पलटण मिळवून त्याजवर आणले. आणि यांनी त्याच्या अंगांत किरमिजी झगा घातला आणि कांट्यांचा मुगट गंफन त्याच्या मस्तकी घातला व त्याच्या उजव्या हातांत वेत दिला,आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून ते मुजरा करून थट्टेने असें ह्मणूं लागले की: "हे यहद्यांच्या राजा, सलाम!" आणि त्यांनी त्यावर धुंकून वेत घेतला व याच्या मस्तकावर मारिला. आणि त्यांनी त्याला चपडाका मारल्या. पुन्हा पिलाताने बाहेर जाऊन त्यांस मटले: “पाहा, त्याकडे काही दोष मला सांप- देत नाही, हे तुह्मास कळावे ह्मणून मी त्याला तुह्माकडे बाहेर आणतो." नेहा येश कांन्यांचा मुगुट व जांबळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला. पिलात त्यांस ह्मणाला, "पाहा हा माणूस!" तेव्हां मुख्य याजक व कामदार त्याला पाहून ओरडत बोलले; "खांबी दे, खांबी दे!" पिलात