पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१४ येशूचे शिक्षानिरूपण, प्रक० १५९ डील आहे तो माझी वाणी ऐकतो." पिलात त्याला ह्मणालाः " सत्य काय आहे!" आणि असे बोलून फिरून यहूद्यांकडे बाहेर जाऊन त्याने त्यांस मटले: “याकडे मला काही दोष सांपडत नाहीं.” आणि मुख्य याजक व वडील यांनी त्याजवर दोष ठेविला असता त्याने काही उत्तर दिले नाही. मग ते आग्रह धरून बोलले की, "तो गालिलापासून आरंभ करून एथपर्यंत अवघ्या यहूदांत उपदेश करीत लोकांस चिथवितो." ३. मग तो हेरोद (अंतीपास) याच्या अधिकारांतला आहे (प्रक०९८ क० ३)असें जाणून पिलाताने त्याला हेरोदाकडे पाठविले, तोही त्या दिवसां- मध्ये यरूशलेमांत होता. हेरोद तर येशूला पाहून फार संतोष पावला, कारण त्याविषयींच्या बहुत गोष्टी ऐकिल्यावरून तो त्याला पाहायास फार वेळ इच्छीत होता, आणि त्याकडून कांहीं चमत्कार होईल तो पाहायाची त्याला आशा होती. मग याने त्याला बहुत गोष्टींविषयी विचारले, परंतु याने याला कांहींच उत्तर दिले नाही. आणि मुख्य याजक व शास्त्री यांनी उभे राहून आवेशाने त्याजवर दोष ठेवले. मग हेरोदाने आपल्या परिवारासहित त्याचा धिकार व थट्टा करून शुभ्र तेजस्वी वस्त्रे लेववून * ) माघारै पिलाता- कडे त्याला पाठविले. त्याच दिवसीं पिलात व हेरोद हे परस्पर मित्र झाले, कांतर पूर्वी त्यांचे परस्पर वैर होते. या _*) रोमी लोकांमध्ये असी चाल होती की, जे कोणी राजकीय किंवा सरकारी काम मिळवायास झटत ते शुभ्र वस्त्र लेत. येशू हा यहूदी लोकांचा राजपदयाचक आहे हे दाखविण्याकारता हेरोद याने त्याला थट्टेने शुभ वस्त्रे लेववली. प्रक० १८९. येशूचें शिक्षानिरूपण.. (मात्थी २७. मार्क १५. लूका २३. योह ० १९.) १. वल्हांडण सणांत लोकांनी अमुक बंदीवान मागितला असतां सुभेदार त्याला सोडून देत असे, आणि त्या वेळेस त्याच्या जवळ ज्याने बंडांत खून केला होता, असा बाराब्बा नामें एक प्रसिद्ध बंदीवान होता. तेव्हां आपणाकरितां तो नेहमी करीत असे, त्याचप्रमाणे त्याने करावे ह्मणून लोक ओरडून मागू लागले. मग पिलाताने त्यांस मटले: “म्या तुह्माकरितां कोणत्याला सोडावे ह्मणून मागतां? बाराब्बा याला किंवा यहुद्यांचा राजा ख्रीस्त झटलेला येशू याला?" कारण यांनी हेव्याने त्याला