पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५८] पिलात व हेरोद यांसमोर येशूचे प्रत्युत्तर, ३१३ २. तेव्हां तो दंडास योग्य ठरला असे पाहून, त्याला पराधीन कर- णारा यहूदा याने पस्तावा केला आणि मुख्य याजक व वडील यांजवळ ते तीस रुपये परत देऊन मटले: “निर्दोष रक्त पराधीन केल्याने म्या पाप केले आहे." ते बोलले: “याचे आह्मास काय? तूं जाण." तेव्हां तो ते रुपये देवळांत टाकून निघाला आणि जाऊन याने गळफास घेतला; आणि पालथे पडून त्याचे पोट फुटले व त्याची आंतडी बाहेर निघालीं (प्रेषित० १,१८). मुख्य याजक तर ते रुपये घेऊन बोलले: हे रक्ताचें मोल आहे ह्मणून हे दानकोशांत टाकावे हे योग्य नाही. मग त्यांनी मसलत केल्यावर त्या रुपयांनी कुंभाराचे शेत परदेश्यांस पुरण्यासाठी विकत घेतले, यास्तव तें शेत रक्ताचे शेत असे आजपर्यंत हटले आहे. प्रक० १४८. पिलात व हेरोद यांसमोर येशूचे प्रत्युत्तर. ( मात्थी २७. मार्क १५. लूका २३. योह ० १८.) १. नंतर यहूद्यांनी येशूला पिलातासमोर कचेरीस आणले, आणि आपणांस विटाळ होऊ नये तर वल्हांडणाचे भोजन करावे, ह्मणून ते कचे- त गेले नाहीत, यास्तव पिलात त्यांकडे बाहेर येऊन बोलला: "तुह्मी या माणसावर कोणता आरोप आणतां?" त्यांनी उत्तर दिले: “तो अपराधी नसता तर आमी त्याला तुझ्या स्वाधीन केले नसते." मग पिलाताने यांस सांगितले. "तुह्मी त्याला घेऊन आपल्या शास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा." यहूदी ह्मणाले: "कोणाचा जीव घ्यावा असा आमाला अधिकार नाही" मग ते त्याजवर दोष ठेवू लागले की, "हा प्रजेला फितावतो. आणि मी ख्रीस्त राजा आहे असे ह्मणून कैसाराला पट्टी देणे मना करि- तो, असा आह्मास अढळला!" २. मग पिलात फिरून कचेरीत गेला आणि येशूला बोलावून त्याला राणाला: "तूं यहूद्यांचा राजा आहेस काय?" येशूने त्याला उत्तर दिले "माझे राज्य या जगांतलें नाहीं; माझें राज्य या जगांतले असते तर म्या जांच्या स्वाधीन होऊ नये ह्मणून माझ्या कामदारांनी लढाई केली ती" तेव्हां पिलात त्याला ह्मणाला “तर तूं राजा आहेस काय?" साने झटले: “तूं ह्मणतोस तेच, मी राजा आहे, मी यासाठी जन्मलों व जगांत आलो की, म्या सत्याविषयी साक्ष द्यावी; जो कोणी सत्याक- 106