पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ न्यायसभेसमोर येशूचे प्रत्युत्तर. यहूदा याचा परिणाम. [प्रक०१५७ येऊन पेतराला ह्मणाले: “ तूंही त्यांतला आहेस खराच, कारण तुझ्या बोलीवरून समजते *). आणि ज्याचा कान पेतराने कापून टाकला होता याचा नातलग असा प्रमुख याजकाच्या दासांतील एक होता, तो ह्मणालाः "म्या तुला त्याच्याबरोबर मळ्यांत पाहिले की नाही?" तेव्हां तो शाप व शपथा वाहून बोलू लागलाः “मी त्या माणसाला ओळखत नाही." तेव्हां दुसऱ्याने कोंबडा ओरडला, मग प्रभूने मुरडून पेतराकडे दृष्टि लाविली. तेव्हां "कोंबडा दोन वेळा ओरडल्याअगोदर तूं तीन वेळा मला नाकार- सील" ही जी प्रभूची गोष्ट ती पेतराला अठवली. आणि पेतर बाहेर जाऊन फार दुःखी होऊन रडला,

  • ) गालाल प्रातांतील लोकांची बोली व वरकड यहूदी लोकांची बोली यांच्या उच्चा-

रात भेद होता. प्रक° १४७. न्यायसभेसमोर येशूचें प्रत्युत्तर. यहूदा याचा परिणाम. (मात्यी २६. मार्क १५. लूका २२. योह ० १८.) १. आणि दिवस उगवल्यावर लोकांचे वडील व मुख्य याजक व शास्त्री मिळाले, आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन बोलले: “तूं खीस्त आहेस काय ? आमास सांग." त्याने त्यांस म्हटले: “म्या तुह्मास सांगितले तरी तुह्मी विश्वास धरणारच नाही, आणि म्या विचारले तरी मला उत्तर देणार नाही व सोडणारही नाही. यापुढे मनुष्याचा पुत्र देवाच्या पराक्रमाच्या उजवीकडे बसेल." ते सर्व बोललेः “तर तूं देवाचा पुत्र आहेस काय?" त्याने त्यांस झटले: “तुह्मी ह्मणतां तो मी आहे." मग ते बोलले: “आमास अणखी साक्षीची गरज काय? कांकी आह्मी स्वतां याच्या तोडचे ऐकिले आहे." मग त्यांनी येशूला बांधून नेले व सुभेदार पंतय पिलात याच्या स्वाधीन केले *). _*) अर्खलाप पदनष्ट झाल्यापासून यहूदा प्रांत रोमी सरकारच्या अमलांन दिला होता (प्रक० ९८. क०३ पाहा). न्यायसभेकडे देहांत शिक्षा करण्याचा अधिकार अणखी राहिला नव्हता, यास्तव आपला हेत सिद्धीस नेण्याकरितां रोमी सरकारासमोर बंड केल्याचा आरोप येशवर आणण्याची त्याच्या वयांस गरज पडली. सुभेदार बहुतकरून कैसरिया एथें राहत होता, परंतु सणाच्या वेळेस यरूशलेमांत येऊन तेथे राहत असे.