पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१० प्रमुख याजकासमोर येशूचे प्रत्युत्तर. प्रक० १५६ केले तर असेच झाले पाहिजे, नाही तर शास्त्र कसे पूर्ण होईल?" मग त्याने त्या दासाच्या कानाला हात लावून त्याला बरे केले. त्याच वेळेस येशू समुदायांस ह्मणालाः "जसे लुटायावर तरवारी व सोटे घेऊन जातां, तसे मला धरायास बाहेर आलां काय? मी प्रतिदिवसीं देवळांत उपदेश करीत तुह्माजवळ बसत असे आणि तुह्मी मला धरले नाही; परंतु ही तुमची घटका व अंधाराचा शक आहे." तेव्हां सर्व शिष्य त्याला सोडून पळाले. मग कोणी एक तरणा नागव्या अंगावर तागाचे वस्त्र घेऊन त्याच्या मागे चालत होता, आणि तरण्यांनी (चाकरांनी) त्याला धरले, पण तो ते वस्त्र टाकून त्यांपासून नागवाच पळाला. प्रक० १८६. प्रमुख यानकासमोर येशूचे प्रत्युत्तर. पेतराने येशूला नाकारणे, (मात्यी २६. मार्क १४. लूका २२. योह० १८.) १. मग ज्यांनी येशूला धरले होते त्यांनी त्याला बांधून प्रमुख याजका- कडे नेले, तेथे शास्त्री व वडील जमले होते. तेव्हां प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या उपदेशाविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले: "मी जगास उघड बोलत असे, सभास्थानांत व देवळांत यहूदी सर्वदां मिळतात, तेथे मी सर्वदां उपदेश करीत असे आणि गुप्तांत कांहीं बोललो नाही. मला कां विचारतोस? त्यांस मी काय बोललों हे ऐकणाऱ्यांस विचार." तो असे बोलत असतां जवळ उभा राहणारा काम- दार येशूला चपडाक मारून बोललाः "तूं प्रमुख याजकाला असे उत्तर करतोस काय?" येशूने त्याला मटले: “मी वाईट बोललो तर त्या वाईटा- विषयी साक्ष दे, परंतु बरें बोललो तर मला कां मारतोस?" तेव्हां मुख्य याजक व वडील आणि संपूर्ण न्यायसभा येशूला जिवे मारायाकरितां त्याविषयी खोटी साक्ष पाहत होते, परंतु त्यांस मिळाली नाही. शेवटी दोन खोटे साक्षी येऊन बोलले: “याने झटले की, देवाचे देऊळ मोडा- यास व तीन दिवसांत ते बांधायास मी समर्थ आहे"*). तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला बोललाः "हे तुझ्याविरुद्ध कसी साक्ष देतात;तूं कांहींच उत्तर देत नाहींस काय?" पण येशू उगाच राहिला. प्रमुख याज-