पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०९ प्रक० १५५] खीस्ताचे हस्तगत होणे. पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती देतात; उठा, आपण जाऊं; पाहा, मला पराधीन करणारा जवळ आला आहे." प्रक० १४४. स्त्रीस्ताचे हस्तगत होणे. (मात्थी २६, मार्क १४. लूका २२. योह० १८.) १. तो बोलत आहे इतक्यांत पाहा, यहूदा आला (यालाही ती जागा ठाऊक होती; कांकी येशू व त्याचे शिष्य तेथे वेळोवेळ एकत्र मिळत असत). आणि त्या संगतीं मुख्य याजक व लोकांचे वडील यांक- डला मोठा समुदाय तरवारी व सोटे घेऊन आला. येशू तर ज्या गोष्टी आपणावर येणार त्या सर्व जाणत असतां पुढे जाऊन त्यांस ह्मणालाः "तुह्मी कोणाचा शोध करतां?" त्यांनी उत्तर दिले की: "नाजरेथकर येशूचा." रोशने त्यांस झटले : "मी तोच आहे," आणि त्याला पराधीन करणारा यहदाही त्यांच्या बरोबर उभा होता. तर “मी तोच आहे" असें तो सांस गुणतांच ते मागे हटून भूमीवर पडले. पुन्हा त्याने त्यांस पुसले "कोणाचा शोध करतां?" ते बोलले: “नाजरेथकर येशूचा." येशू ह्मणाला : "मी तोच आहे असे म्या तुह्मास सांगितले; ह्मणून माझा शोध करीत असला तर यांस जाऊं द्या." त्याला पराधीन करणाऱ्याने तर त्यांस खूण सांगून ठेविली होती की, "मी ज्याचे चुंबन घेईन, तोच तो आहे, त्याला धरा!" लागलेच त्याने येशूजवळ येऊन मटले: “हे गुरू सलाम!" आणि त्याचे चुंबन घेतले. तेव्हां येशूने त्याला झटले: “यहूद्या, चुंबनाने मनुष्याच्या पत्राला पराधीन करतोस काय?" मग त्यांनी जवळ येऊन येशुला धरले. २. मग त्याकडले लोक काय होणार हे जाणून त्याला ह्मणाले: "प्रभ, आह्मी तरवारीने मारूं काय ?" तेव्हां शिमोन पेतराजवळ तरवार होती, ती त्याने उपसली आणि प्रमुख याजकाच्या दासाला मारून त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नांव मलखा होते, तेव्हां येश बोललाः "तूं आपली तरवार म्यानांत परत घाल. कारण जे तरवार धरतात ते सर्व तरवारीने नाश पावतील. म्या आपल्या बापाजवळ आतां मागितले, तर तो दूतांच्या १२ सैन्यांपेक्षा अधिक मला देईल असा मी समर्थ नाही, हे तुला वाटते काय? असे