पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०८ गेथ्सेमाने बागांतील येशूची अवस्था. प्रक० १५४ प्रक० १८४. गेथ्सेमाने बागांतील येशूची अवस्था. (माथी २६. मार्क १४. लूका २२.) या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांसहित निघून रीतीप्रमाणे जाईत झाडांच्या डोंगरास गेला. मग येशू त्यांस ह्मणालाः "तुह्मी सर्व याच रात्री मजविषयीं अडखळाल." तेव्हां पेतर त्याला ह्मणाला: "सर्व तुजमुळे अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही." येशू त्याला ह्मणालाः “मी तुला खचीत सांगतो आज याच रात्री कोंबडा दोन वेळा ओरडल्या अगोदर तूं मला तीन वेळा नाकारतील." पण तो फार अधिक बोलू लागला की: "जरी मला तुजबरोबर मरावे लागले, तरी मी तुला नाकारणारच नाही." सर्वांनीही तसेच मटले. नंतर येशू त्यांबरोबर गेथ्- सेमाने या नांवाच्या ठिकाणी आला. आणि शिष्यांस ह्मणालाः “मी जाऊन तेथे प्रार्थना करीन तोपर्यंत एथे बसा.” आणि पेतर व याकोब व योहान्न यांस बरोबर घेऊन तो फार घाबरा व कष्टी होऊ लागला आणि त्यांस ह्मणालाः "माझा जीव मरणापर्यंत खिन्न आहे, एथे राहा व मजबरोबर जागे असा." मग तो त्यांजपासून सुमारे धोड्याच्या टप्या इतका दूर गेला आणि गुडघे टेकून त्याने प्रार्थना केली की: “हे माझ्या बापा, तुझ्याने सर्व करवते, साधेल तर हा प्याला मजपासून टाळून जावा, तथापि माझी इच्छा आहे असे नको, तर तुझी इच्छा आहे तसे होवो!" मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून तो पेतराला ह्मणालाः "शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही मजबरोबर तुमच्याने जागे राहवेना काय?तुह्मी परीक्षेत येऊ नये ह्मणून जागे राहा व प्रार्थना करा; आत्मा मान्य आहे खरा पण देह' अशक्त." अणखी दुसऱ्याने जाऊन त्याने असी प्रार्थना केली की: "हे माझ्या बापा, हा प्याला मी प्याल्यावांचून टळत नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग त्याने येऊन ते पुन्हा झोपी गेले आहेत असे पाहिले. नंतर पुन्हा जाऊन त्याने तिसऱ्याने तेच वाक्य ह्मणून प्रार्थना केली. मग आकाशांतील दूत त्याच्या दृष्टीस पडला, तो त्याला बलाविता झाला. तेव्हां फार कष्टी होऊन त्याने मोठ्या निष्ठेने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा भूमीवर पडूं लागला. मग आपल्या शिष्यांकडे येऊन तो त्यांस ह्मणाला: "अजून झोप व विसावा घेतां?