पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५३] येशूचे शेवटचे भाषण. ३०७ विणाऱ्याकडे मी जातो. म्या जावे हे तुह्मास उपयोगी आहे, कारण मी न गेलो तर संबोधक तुह्माकडे येणार नाही, मी गेलो तर त्याला तुह्माकडे पाठवीन. अद्याप मला बहुत गोष्टी तुह्मास सांगायाच्या आहेत, परंतु आतां तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. पण जेव्हां सत्याचा आत्मा येईल तेव्हां तो तुह्मास साऱ्या सत्यांत नेईल. तो माझा महिमा प्रगट करील. कारण जे माझे त्यांतून घेऊन ते तुह्मास सांगेल. मजमध्ये तुम्हास शांति असावी म्हणून म्या तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. जगांत तुह्मास क्लेश होईल, परंतु धीर धरा, म्या जगाला जिंकले आहे." ३. या गोष्टी बोलल्यावर येशूने आपली दृष्टि वर आकाशाकडे करून मटले: “हे बापा, घटका आली आहे, तूं आपल्या पुत्राचा माहमा कर यासाठी की तुझ्या पुत्रानेही तुझा महिमा प्रगट करावा. खा त्याला मनुष्यमात्रावर असा अधिकार दिला आहे की, जे बा त्याला दिले आहेत त्या सर्वांस त्याने सर्वकालचे जीवन द्यावे, आणि सर्वकालचे जीवन में आहे की, जो केवळ खरा देव त्या तुला,आणि येशू खीस्त ज्याला खा पाठविले त्याला त्यांनी जाणावे. पृथ्वीवर म्या तुझा महिमा प्रगट केला आहे, जे काम करायाला खा मला सोंपले, ते म्या पूर्ण केले आहे. तर आतां, हे बापा, जग होते त्यापूर्वी तुझ्याजवळ जो माझा महिमा होता, त्याकडून तूं आपणाजवळ माझा महिमा होऊ दे. जी माणसे जगांतून खा मला दिली त्यांस म्या तुझें नांव प्रगट केले आहे. यापुढे मी जगांत नाही. परंतु ते जगांत आहेत आणि मी तुजकडे येतो. हे पवित्र बापा, खा जे मला दिले, जसे आमी एक आहो तसे तेही एक असावे, ह्मणून तूं आपल्या नामाने त्यांस राख. तूं आपल्या सत्याने त्यांस पवित्र कर, तुझे वचन हे सत्य आहे. मी त्यांच्यासाठी मात्र मागत नाही, तर त्यांच्या वचनावरून जे मजवर विश्वासतील त्यांच्यासाठीही मागतो की, ते सर्व एक असावे, जसे तूं बापा जमध्ये आणि मी तुजमध्ये, तसे तेही आमामध्ये एक असावे, यासाठी की बा मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा"*). ही प्रार्थना करून तीस्ताने आपले जे त्यांसाठी रदबदली केली, ह्मणून इला मध्य- स्थीची प्रार्थना झटले आहे.