पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०६ येशूचे शेवटचे भाषण. प्रक० १५३ तर यावरून तुह्मी माझे शिष्य आहां असे सर्व समजतील.”—मग भोजन झाल्यावर येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून ती मोडली आणि ती शिष्यांस देऊन झटले : "घ्या, खा, है तुह्मासाठी दिलेले माझे शरीर आहे, माझ्या अठवणीसाठी हे करा." आणि जेवल्यानंतर त्याने त्या- प्रमाणे प्यालाही घेऊन मटले: “हे नव्या कराराचे माझें रक्त आहे, हे बहुतांकरितां ओतले आहे. जितकेदां तुह्मी हा प्याला पितां तितकेदां माइया अठवणीसाठी हे करा"*).

  • ) (प्रक०३२ टी०१ पाहा.) खीस्त हा खरें वहाडण कोकरूं आहे. पापाच्या

नाशापासून आमास तारायाला आणि पापाच्या दासपणांतून मुक्त करायाला त्याने स्वतां योग्य व सर्वकाळपर्यंत टिकणारा यज्ञ होऊन जगाच्या पापाकरिता आपणाला अपिलें.- आणि आता जे कोणी खरा विश्वास धरून वाप्तिरमा घेऊन त्याच्या जीवनाचे विभागी झाले, त्यांचे आपल्या संगतीत निरंतर रक्षण व पुष्टीकरण होण्यासाठी तो आपलें मांस व रक्त यांनी आस्मिक रीतीने त्यांचं पोषणही करितो. प्रक० १८. येशूचे शेवटचे भाषण. (योह० १५-१७.) १. मग त्यांनी गीत गाऊन येशू ह्मणाला "मी खरा द्राक्षवेल आहे, आणि माझा बाप माळी आहे. तो माझ्यांतला जो जो फांटा फळ देत नाहीं तो तोडून टाकतो, आणि जो जो फळ देतो त्याने अधिक फळ द्यावे ह्मणून तो साफ करतो. तुझी मजमध्ये राहा आणि मी तुह्मामध्ये; जसे फांज्याच्याने वेलांत राहिल्यावांचून आपल्या आपण फळ देववत नाही, तसे मजमध्ये राहिल्यावांचून तुमच्यानेही देववत नाही. मी वेल आहे तुह्मी फांटे आहां, जो मजमध्ये राहतो आणि मी त्यामध्ये तो बहुत फळ देतो; कारण मजहून वेगळे असल्यास तुमच्याने कांहीं करवत नाही." २. "आणि असी वेळ येती की, जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला मी देवाची सेवा करतो असे वाटेल. आणि ते बापाला व मलाही जाणत नाहीत, ह्मणून ते तुह्मास असे करतील. म्या पहिल्याने तुह्मास या गोष्टी सांगितल्या नाहीत कारण मी तुह्माबरोबर होतो. पण आता मला पाठ-