पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५२] वल्हांडण भोजन. ३०५ भाषणाचा अर्थ असा होतो की ख्रिस्तो मनुष्य प्रथम पापाची क्षमा पावन सागी स्वच्छ होतो, परंतु आपला या पापी जगांत व्यवहार असल्यामुळे जगांतील अमंगळपणाने आपली चाल अमंगळ होऊ नये, म्हणून ख्रिस्ती मनुष्याला आपले पाय धुवून घेण्याची म्हणजे आपल्या पापांची क्षमा मिळवून घेण्याची नित्य आणि विशेषेकरून प्रभुभोजन घेण्याच्या वेळेस गरज आहे. +) तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत असे प्रभूने म्हटले आहे. या बोलण्यांत केवळ वाह्याकारी एकमेकांचे पाय धुवावे असा भाव नाही, तर सर्व प्रकारे एकमकेविर नम्रतेने प्रीति व सेवाही करावी अशाविषयी दाखला आहे. ३. नंतर येशू यांस ह्मणालाः “म्या सोसण्यापूर्वी हे वल्हांडण । भोजन तुह्मांबरोबर करायास मी फार उत्कंठेने इच्छीत होतो; कांतर मी तमास सांगतो की, देवाच्या राज्यांत हा सण पूर्ण होईल तोपर्यंत मी यापढे या भोजन करणार नाही." मग त्याने प्याला घेतला आणि आशीर्वाद मागून तो बोललाः "हा घ्या आणि आपणांमध्ये वांटून द्या, कारण मी तुह्मास सांगतो, मी आपल्या बापाच्या राज्यांत तुह्माबरोबर नवा पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलाचा हा उपज एव्हांपासून पिणारच नाही." आणि असे बोलून येशू आत्म्यांत व्याकुल होऊन ह्मणालाः “मी तुह्मास खचीत खचीत सांगतोः तुमच्यांतला एक मला पराधीन करील." तेव्हां तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले, आणि ज्यावर येशूची प्रीति होती असा त्याच्या शिष्यांतील एक (योहान) भोजनाच्या वेळेस येशूच्या उरासी टेकला होता. तर ज्या- विषयीं तो बोलतो तो कोण असेल, असे पुसावे ह्मणून शिमोन पेतराने त्याला खुणावले. तो तर येशूला ह्मणालाः "प्रभू , तो कोण आहे?" येशने उत्तर दिले: “ज्याला मी तुकडा वुचकळून देईन तोच तो आहे." मग त्याने तुकडा बुचकळून यहूदा इस्कारयोते याला दिला. आणि तकडा दिल्यावर सैतान त्याजमध्ये गेला. तेव्हां येशूने त्याला ह्मटले: “जे तूं करतोस ते लवकर कर!" मग लागलाच तो बाहेर गेला, आणि त्या वेळेस रात्र झाली होती. मग तो बाहेर गेल्यावर येशूने झटले: “आतां मनष्याचा पुत्राचा महिमा होतो, आणि त्याजवरून देवाचा महिमा होतो. मलानो, अद्याप थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. मी तुह्मास नवी आज्ञा देतो की, एकमेकांवर प्रीति करा, जसी म्या तुह्मावर प्रीति केली तसी तरीही एकमेकांवर प्रीति करा. तुमची एकमेकांवर प्रीति असली, 391