पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवटच्या न्यायाविषयीं दाखले. प्रक० १५१ मूर्ख शाहाण्यांस ह्मणाल्या, तुह्मी आपल्या तेलांतून आमास कांहीं द्या, कांकी आमच्या मशाली विझतात. पण शाहण्यांनी उत्तर दिले की, कदाचित् आह्मास व तुह्मास पुरणार नाहीं; त्यापेक्षा तुह्मी विकणान्यांच्या एथे जाऊन आपल्याकरितां विकत घ्या. त्या विकत घ्यावयास गेल्या इतक्यांत वर आला, आणि ज्या तयार होत्या त्या त्याच्या संगती लग्नास आंत गेल्या, आणि दार बंद झाले. मागून त्या दुसऱ्या कुमारी येऊन ह्मणाल्याः हे प्रभू , प्रभू, आमासाठी उघड. पण त्याने उत्तर दिले की, मी तुह्मास खचीत सांगतो, तुमास ओळखत नाही. यास्तव तुह्मी जागे राहा. कांकी कोणत्या दिवसी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल है तुह्मास ठाऊक नाहीं" * ). ) ड्या मशालौंला तेल नाहींन्या ज्यांचा खीस्तावर खरा विश्वास नाहीं नांवाचे मात्र खिस्ती आहेत अशा खिस्ती लोकांचे दर्शक आहेत. तेल विकणारा तो पवित्र आत्मा होय. आपणाला व जगाला नाकारणे ही तेलाची किंमत, आणि लग्न हे अनादि काला, सुख आहे. २. “कोणी एका प्रवासास जाणाऱ्या माणसाने आपल्या चाकरांस बोलाविले व आपली मालमत्ता यांस सोपली, आणि एकाला त्याने पांच हजार रुपये व एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे प्रत्येकास ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि लागलाच प्रवासास गेला *). मग बहुत कालानंतर त्या चाकरांचा धनी आला व त्यांचा हिशेब घेऊं लागला. तेव्हांज्याला पांच हजार रुपये मिळाले होते, तो येऊन अणखी पांच हजार रुपये आणून ह्मणालाः महाराज, आपण पांच हजार रुपये सोपून दिले, पाहा, त्यांवर म्या अणखी पांच हजार रुपये मिळविले. त्या- च्या धन्याने त्याला मटले बरे, उत्तम व विश्वासू चाकरा, थोडक्यांवर तूं विश्वासू झालास, बहुतांवर मी तुला ठेवीन; तूं आपल्या धन्याच्या आनं- दांत ये. त्याचप्रमाणे ज्याला दोन हजार रुपये मिळाले होते त्याच्यांनी त्याने अणखी दोन हजार मिळविले, त्यालाही त्याने तसेच सांगितले. मग ज्याला एक हजार रुपये मिळाले होते, तो येऊन ह्मणालाः महाराज, म्या तुला जाणले की तूं कठोर माणूस आहेस, जेथे वा पेरलें नाहीं तेथे तू कापतोस, आणि खा विखरिलें नाहीं तेथून गोळा करतोस, ह्मणून भिऊन तुझे हजार रुपये म्या भूमीत लपवून ठेवले + ). पाहा तुझे तुला मिळाले !