पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १५१] शेवटच्या न्यायाविषयी दाखले. ३०१ कोणाला ठाऊक नाही, आकाशांतील दूतांसही नाही व पुत्रालाही नाहीं+), केवळ माझ्या बापाला ठाऊक आहे."

  • ) यरूशलेमाच्या नाशासंबंधी हे वचन पूर्ण झाले, कारण वरावर एक पिटीने

पवित्र नगराचा नाश झाला. परंतु कालाच्या समाप्ति विषयी पाहिले असता हे वचन अणखी पूर्ण होणार आहे. कारण यहूद्यांची पिढी झणजे यहूदी लोक कालाच्या समाप्ति- पर्यंत राहतील (प्रक. १९४ पाहा). +) खीरत देवाचा पुत्र असता मानवी अवस्थेने पृथ्वीवर येऊन त्याने ईश्वरी गणीचा परिपूर्ण उपयोग केला नाही, म्हणून जोपर्यंत तो पृथ्वीवर राहिला तोपर्यंत 'पुत्रा- लाही ठाऊक नाही' असे म्हणणे योग्य होतें.. ५. "आणि नोहाचे दिवस जसे होते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे- दही होईल, कारण जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत नोह तारवांत मला त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत व लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस घेऊन गेला तोपर्यंत ते समजले नाहीत. ह्मणून जागे राहा, कांकी घरधनी केव्हां येईल हे नवास ठाऊक नाही. आणि गुंगी व मद्यपान व संसाराच्या चिंता यांक- मची अंतःकरणे कधी जड होऊ नयेत, आणि तो दिवस आक- मात तह्मावर येऊ नये ह्मणून आपणांस संभाळा, कारण सर्व पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राहणाऱ्यांवर तो फांसासारखा येईल. आणि जे मी तुह्मास सांगतो ते सर्वांस सांगतो : जागे राहा!" प्रक० १८१. शेवटच्या न्यायाविषयों दाखले. (मात्थी २५.) १. "तेव्हां आकाशाचे राज्य दाहा कुमारीसारखे होईल; त्या आपल्या मशाली घेऊन वराला भेटावयास निघाल्या. त्यांत पांच शहाण्या व पांच मूर्ख अशा होत्या. मूर्ख होत्या, त्यांनी आपल्या मशाली घेतल्या पण आपल्या बरोबर तेल आणले नाहीं; शाहाण्यांनी तर आपल्या शाली बरोबर आपल्या बुधल्यांत तेल आणले. मग वराला उशीर लाग- यावरून सर्वांस डुकल्या येऊन झोप लागली. मग मध्यरात्री असी हाक झाली की: पाहा, वर येत आहे, त्याच्या भेटीस बाहेर चला! तेव्हा त्या सर्व कुमारी उठल्या व आपापल्या मशाली नीट करूं लागल्या. मग