पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०० आपल्या पुन्हा येण्याविषयी खीस्ताचा भविष्यवाद. [प्रक० १५० ३. तर ओसाडकारक अघोर पदार्थ पवित्रस्थानांत उभा राहिलेला तुह्मी पाहाल, तेव्हां जे यहूदांत असतील त्यांनी डोंगरांवर पळून जावे * ). कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाले नाहीत व होणारही नाहीत, असे मोठे क्लेश त्या काळी होतील. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणीच न निभावता, पण निवडलेल्यांसाठी ते दिवस थोडे केले जातील, कारण खोटे खीस्त व खोटे भविष्यवादी उठतील, आणि असी मोठी चिन्हें व चमत्कार दाखवितील की, साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवितील. पाहा, म्या अगोदर तुह्मास सांगून ठेवले. आणि जसी वीज पूर्वेतून निघून पश्चिमेपर्यंत चमकती, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणेही होईल. कां तर जेथे कोठे प्रेत असेल तेथे गीध जमतील ).. .) रोमी सैन्य जेव्हां यरूशलेमावर उतरले तेव्हां खिस्ती लोक या वचनाची अठवण करून यरूशलेम सोडून यादेंनेच्या पलिकडील डोंगरांवरचे पल्ला नामक नगर, ज्यामध्ये विदेशी लोक राहत होते, तेथे गेले आणि यरूशलेमावर जें महासंकट आले त्यातून ते निभ- वले (प्रक० १९४ पाहा ). +) यहूदी लोक निर्वळ झाले असता त्यावर रोमी सैन्य गिर्धा प्रमाणे चालून आलें, आणि त्याच्या झंड्यावर गरुड (हिंसक पक्षी) याची आकृति केली होती; यामुळे वरील बोलण्यांत गिधाविषयों उदाहरण दिले आहे. ४. आणि त्या दिवसांतील क्लेशानंतर लागलाच सूर्य अंध:कारमय होईल, चंद्र आपला उजेड देणार नाहीं, तारे आकाशांतून पडतील आणि आकाशांतील सैन्ये तळमळतील. तेव्हां मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आका- शांत दिसेल, त्या काळी पृथ्वीच्या सर्व जाती ऊर बडवून घेतील, आणि मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या प्रतापाने आकाशाच्या मेघांवर यतांना पाहतील. आणि करण्याच्या मोठ्या नादाने तो आपल्या दूतांस पाठवील, आणि ते आकाशाच्या एका शेवटापासून दुसऱ्या शेवटापर्यंत त्याच्या निवडलेल्यांस चहुंकडून जमा करतील. अंजिराच्या झाडाचा दाखला समजून घ्या, त्याच्या डहाळीला रस येऊ लागला व पाने फुटू लागली ह्मणजे उन्हाळा जवळ आला असे समजतां, तसेच तुह्मी या सर्व गोष्टी पाहाल, तेव्हां तो काळ जवळ दारासी आहे असे समजा. मी तुह्मास खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईल तोपर्यंत ही पिढी टळून जाणार नाहीं *). पण त्या दिवसाविषयी व त्या घटके विषयों