पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बोकी यामी गती १४९ २९८ परोशी व सदोकी यांसी संवाद. प्रक० १४९ अंधळे वाटाडे, तुह्मी मुरकुटाला गाळतां पण उंटाला गिळतां. अहो शास्त्री व परोशी, तुझा ढोग्यांस हाय! कारण तुह्मी चुना लावलेल्या कबरांसारखे आहां, त्या बाहेरून सुंदर दिसतात खऱ्या, परंतु आंतून मेलेल्यांच्या हाडांनी भरलेल्या आहेत. तसेच तुह्मी बाहेरून माणसांस नीतिमान दिसतां खरै, परंतु आंतून ढोगाने व अधर्माने भरले आहां, अहो शास्त्री व परोशी, तुह्मा ढोंग्यांस हाय! तुह्मी भविष्यवाद्यांच्या कवरा बांध- तां, आणि नीतिमानांची थडी सुंदर करितां आणि ह्मणतां : आह्मी आप- ल्या वडिलांच्या दिवसांत असतो, तर भविष्यवाद्यांच्या घाताविषयी त्यांचे सोबती झालो नसतो. याप्रमाणे तुह्मी भविष्यवाद्यांचा घात करणान्यांचे पुत्र आहां, असी तुह्मी आपणांविषयी साक्ष देतां, आणि तुह्मी आपल्या वडिलांचे माप भरा! (प्रक० १४८ क० २ पाहा) सापानो, फुरस्यांच्या पिलानो, नरकदंड कसा चुकवाल.-हे यरूशलेमा, यरूशलेमा, भविष्य- वाद्यांचा घात करणाऱ्या व आपल्याकडे पाठविलेल्यांस धौडमार करणाऱ्या, जसी कोबडी आपली पिलें पंखाखाली एकवटती त्या प्रकारे तुझ्या लेक- रांस एकवटायास कितीदां माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती. पाहा, तुमचे घर तुह्माकरितां ओसाड पडले आहे. 9) नियमशास्त्राप्रमाणे सर्व प्रकारच्या उपजांचा दशमांश देवळांत आणावा असे होते. परोशी लोकांनी तर हा नेम साहन क्षलक व कनिष्ठ अशा पदार्थाच्या उपजासही लाग केला होता. । ५. नंतर येशू (देवळांतील) भांडारासमोर बसून लोक भांडारांत पैका कसे टाकतात हे पाहत होता, तेव्हां बहुत धनवान फार टाकीत होते. आणि एका दरिद्री विधवेने येऊन दोन टोल्या, ह्मणजे एक दमडी टाकली. मग तो आपल्या शिष्यांस बोलावून त्यांस ह्मणाला: “मी तुह्मास खचीत सांगतो की ज्यांनी भांडारांत टाकले त्या सर्वांपेक्षा त्या दरिद्री विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या भरपुरांतून देवाच्या दानांत टाकलें, इने तर आपल्या कमतींतून आपली जी उपजी- विका होती ती सर्व टाकली.