पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १४९] परोशी व सदोकी यांसी संवाद. २९७ ह्मटले की, मी अब्राहामाचा देव व इझाकाचा देव व याकोबाचा देव आहे. देव हा मेलेल्यांचा देव नव्हे, जिवंतांचा देव आहे." ३. मग त्याने सदोकी कुंठित केले है परोश्यांनी ऐकून त्यांतील एकाने त्याला विचारले : “हे गुरू, नियमशास्त्रांत कोणती आज्ञा मोठी?" येश त्याला ह्मणाला : “तुझा देव प्रभु यावर तूं आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व मनाने प्रीति कर; हीच पहिली व माठी आज्ञा आहे. आणि इच्यासारखी दुसरी आहे की, जसी तूं आप- णावर तसी आपल्या शेजान्यावर प्रीति कर. या दोन आज्ञांत सर्व नियमशास्त्र व भविष्यशास्त्र आटली आहेत."-आणि परोशी मिळाले असतां त्यांस येशूने विचारले की: “ख्रीस्ताविषयीं तुह्मास कसे वाटते? तो कोणाचा पुत्र आहे ?" ते त्याला ह्मणाले: “दावीदाचा." त्याने त्यांस मटले: “तर मग दावीद आत्म्याकडून त्याला प्रभु असे का ह्मणतो (गीत ११०,१.) की, प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले : मी तुझे वैरी तो पादासन करीपर्यंत तूं माझ्या उजवीकडे बैस ! यास्तव दावीद त्याला जर प्रभ ह्मणतो, तर तो त्याचा पुत्र कसा होईल?"*) तेव्हां कोणाच्याने याला एका शब्दाने देखील उत्तर देववेना, आणि त्याला अणखी विचा- रायास कोणीही धजला नाहीं.

  • ) मनुष्य असतां खीस्त दावीदाचा पुत्र, पण देव असतो तो दावीदाचा प्रभु होय.

४. तेव्हां येशू ह्मणाला : “शास्त्री व परोशी मोश्याच्या आसनावर बसले आहेत, यास्तव जे जे ते तुह्मास पाळायास सांगतील ते अवघे पाळा व करा, पण त्यांच्या करण्याप्रमाणे करूं नका. आणि आपणास गुरूजी असे ह्मणवून घेऊ नका, कारण तुमचा एकच गुरु ख्रीस्त आहे, जो तमामध्ये मोठा तो तुमचा चाकर व्हावा. कारण जो कोणी आपणाला उँच करील तो नीच केला जाईल, आणि जो कोणी आपणाला नीच करील तो उंच केला जाईल. अहो शास्त्री व परोशी, तुह्मा ढोंग्यांस हाय! नयी आकाशाचे राज्य माणसांपुढे बंद करतां, ह्मणजे तुह्मी स्वतां आंत जात नाही. आणि आंत जाणाऱ्यांसही जाऊं देत नाही. अहो शास्त्री व परोशी. नया ढोग्यांस हाय! कांकी पुदीना व शेफा व जिरे यांचादहावा भागतुह्मी ता*), परंतु नियमशास्त्रांतील मुख्य गोष्टी ह्मणजे न्याय व दया व विश्वास या तली टाकल्या; ह्या करायाच्या होत्या आणि त्या सोडायाच्या नव्हत्या. 381