पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९६ परोशी व सदोकी यांसी संवाद. प्रक० १४९ समोर त्याच्या बोलण्यांत त्याला धरवेना. तर ते उगेच राहिले आणि त्याला सोडून गेले. _*) परोशी व सदोकी हे परस्पर वर वाळगात असत, परंतु देवाचा पवित्र जो, त्यावर दोष लावायास त्यांचा ऐक्यभाव झाला होता. त्यांस वाटले होते की, वरील प्रश्नाचं उनर देतांना पट्टी देऊं नये असे जर तो म्हणेल, तर त्याला हेरोद व रोमी यांस जाब द्यावा लागेल; आणि पट्टी द्यावी असे जर उत्तर करील, तर यहूदी लोक त्याला मशीहा मानणार नाहीत, कारण रोमी सरकाराला पट्टी देणे हे यहूदी लोकांस फार अघोर वाटत होते, तर तो रोमी लोकांपासून भापांस सोडवील असे समजत होते.-वीस्ताच्या उत्तरावरून देवाच्या थोरपणाविषयी त्याचा अतिशय आवेश दिसन येतो. तरीही लोकांनी त्यावर आरोप ठेवावा असा तो अगदी गंतला गेला नाही. पट्टीच्या नाण्यावरील रोमी कैसर जो मापजक त्याचा मुखवटा, देवाने आपल्या लोकांस शासन होण्यासाठों विदेश्यांच्या स्वाधीन केले, याविषयी साक्षीभत होता. जें देवाचें तें जर त्यांनी देवाला भरून दिले असते, झणजे आपले अंतःकरण, मन, संपूर्ण अंतर्याम ही जी परमेश्वरावी प्रतिमा व ब्यावर त्याचा शिका, ती देवाच्या ताब्यात दिली असतो. तर त्यांचा ब कैस- राचा काही संबंध झाला नसता, आणि मग जे कैसऱ्याचे, म्हणजे ज्यावर त्याचा मखवटा ने कैसराला भरून द्यावे लागले नसते. देवाचा त्याग करणारे यहूदी यांच्या शासना- साठी जें विदेशी सरकार देवाने नमिले होते त्यापासून आपली सटका करून घेण्याकरिता त्यावर उठावे हे योग्य नव्हते. जें देवाच ते त्याला भरून द्या, झणजे आपण देवाकडे फिरून त्याला संतोषवावें हाच मोकळीक पावण्याचा उत्तम मार्ग होय. २. त्याच दिवसी पुन्हा उठणे नाही असे मणणारे सदोकी यांनी त्याजकडे येऊन त्याला विचारले की: “हे गुरू, मोश्याने सांगितले, जर कोणी एक लेकरें झाल्यावांचून मेला तर त्याच्या भावाने त्याची बायको घ्यावी (प्रक०५७ क० ३ टीका.) तर आह्मामध्ये सात भाऊ होते, त्यांतला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतति नसतां त्याची बायको त्याच्या भावासाठी राहिली. त्याप्रमाणे दुसरा व तिसराही सातव्या- पर्यंत. तर पुन्हा उठण्याच्या वेळेस ती त्या सातांतील कोणाची बायको होईल?"येशूने त्यांस उत्तर दिले की: "शास्त्र व देवाचे सामर्थ्यही तुझी जाणत नाही यामुळे चुकतां. कारण पुन्हा उठण्याच्या वेळेस ते लग्न करून घेत नाहीत व लम करून देतही नाहीत, तर आकाशांतील देवाच्या दूतांसारखे असतात. पण मेलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयीं देवाने जे सांगितले ते तुमी मोश्याच्या पुस्तकांत वाचलें नाहीं काय? त्यांत देवाने असें