पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६] नोहाची संतती. प्रक० ह. नोहाची संतती. ( उत्प० ९-११.) १. नोहाने तर शेतकरी होऊन द्राक्षमळा लावला. मग तो द्राक्षरस प्याला आणि माजून डेन्यांत नागवा पडला. तेव्हां खनानाचा बाप हाम याने आपल्या बापाचे नागवेपण पाहिले, आणि बाहेर आपल्या दोघां भावांस सांगितले, तेव्हां शेम व याफेथ यांनी वस्त्र घेऊन आपल्या दोघांच्या खांद्या- वर ठेवले, आणि पाठमोरे जाऊन आपल्या बापाचे नागवेपण झांकले. नंतर नोह सावध झाला, आणि आपल्या धाकट्या पुत्राने आपणास में केले होते ते समजला. तेव्हां तो ह्मणालाः "खनान शापित असो; तो आपल्या भावांजवळ चाकरांचा चाकर होईल! स्तुत्य शेमाचा देव परमे- श्वर, आणि त्याचा चाकर खनान होईल. देव याफेथाचा विस्तार करील, आणि हा शेमाच्या डेन्यांत राहील आणि त्याचा चाकर खनान होईल!"*) आणि नोह जलप्रलयानंतर ३५० वर्षे जगला; तसे नोहाचे सर्व दिवस ९५० वर्षे झाली.

  • ) भविष्य जाणून नोह समजतो की, शेम हा देवाचा निवडून घेतलेला आहे. शेमा-

च्या घराण्यातून सर्व मनुष्यजातीसाठी तारण येईल, आणि याफेथ हा त्या तारणाचा सहभागी होईल. परंतु हाम याने आपल्या निंद्य कर्माने आपणास व आपली सर्व घराणी यांसही शापग्रस्त करून घेतले, आणि त्या शापाचा भार अजूनही बहुत वेळपर्यंत त्याच्या वंशावर राहील. तरी हामाच्या संततीतील लोकांस तारण मिळणार नाही असे नाही, कारण की, "मिसरातन सरदार येतील, खुश आपलें द्रव्य देवाकडे वाहवील," असें वचन आहे (गीत ६८,२२). २. सर्व पृथ्वीवर भाषा एक होती, आणि माणसे जातां जातां शिनार देश (फराथ व टिग्रीस ह्या नद्यांमधील प्रदेश) यामध्ये त्यांस मैदान लागले, आणि ते तेथे राहिले. मग ते एकमेकांस ह्मणाले: "चला, आपण सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगू नये ह्मणून आपणासाठी नगर व बुरूजही बांधू, आणि याचे शिखर आकाशापर्यंत होवो आणि तसे आपले नाम करूं." मग जे नगर व जो बुरूज मनुष्यसंतान बांधिते झाले, ती पाहायास पर- मेश्वर उतरला आणि ह्मणालाः “पाहा, लोक एकच आणि त्या सर्वांची भाषा एक, आणि ते हे करूं लागतात; तर आतां ते जे कांहीं करायास योजतील, ते त्यांपासून आकळणार नाही. चला, आपण उतरूं, आणि 3H