पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

eO1) जलप्रलय. [प्रक०५ णाकडे तारवांत घेतला. नंतर अणखी सात दिवस वाट पाहून त्याने पुन्हा पारवा तारवांतून सोडला, तो संध्याकाळी त्याकडे आला, तेव्हां पाहा, त्याच्या चोचीत जाईत झाडाचे कोवळे पान होते. मग त्याने अणखी सात दिवस वाट पाहिली आणि पारवा सोडला, पण तो याजवळ कधी परत आला नाही. तेव्हां नोहाने तारवाचे झांकण काढून पाहिले, आणि पाहा, भूमीची पाठ सुकी झाली होती. दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यांतील सत्ताविसाव्या दिवसीं पृथ्वी वाळली होती. ३. मग देवाने नोहाला सांगितले की: "तूं व तुझे पुत्र व जी कांहीं तुजसंगती आहेत त्यांसुद्धां तारवांतून जा." मग नोहाने निघून परमेश्वरा- साठी वेदी बांधली आणि तिजवर होम केले. तेव्हां परमेश्वराने सुवास घेतला आणि आपल्या मनांत मटले की: "मनुष्यामुळे मी भूमीस अणखी कधीं शापणार नाही. कारण मनुष्याच्या मनातील भावना त्याच्या बाळ- पणापासून वाईट आहे. यापुढे पृथ्वीच्या अवघ्या दिवसांपर्यंत पेरणी व कापणी, आणि थंडी व ऊन, आणि उन्हाळा व हिवाळा, आणि दिवस व रात्र ही सरणार नाहीत.” आणि देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांस आशीर्वाद देऊन त्यांस मटले की: "सफळ व्हा आणि बहुत होऊन पृथ्वी पूर्ण करा, आणि पृथ्वीतील सर्व पशूवर व सर्व प्राण्यांवर तुमचे भय व धाक राहील, ती तुमच्या हाती दिलेली आहेत. प्रत्येक जंतु तो तुमचे खाणे, असे होईल; जसी कोवळी हिरवळ तसी म्या तुह्मास अवघी दिली आहेत, तथापि त्याचे रकासंगतीं मांस खाऊ नका.जो माणसाचा रक्तपात करितो, त्याचा रक्तपात माणसाकडून व्हावा, कांकी देवाने आपल्या प्रतिछायेप्रमाणे माणसाला उत्पन्न केलें.” आणि देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांस सांगितले की: पाहा, तुह्मासी आणि तुमच्या संगतीं पृथ्वीवरील प्रत्येक जिवासी मी आपला करार स्थापीन की, सर्व प्राणिमात्र प्रलयाच्या जलाकडून पुन्हा नष्ट होणार नाहीत, म्या आपले धनुष्य मेघांत ठेवले आहे, आणि ते आपल्या कराराची खूण होईल. आणि असे होईल की मी पृथ्वीवर मेघ आणीन त्यावेळेस मेघांत धनुष्य दिसेल.तेव्हां मजसी व तुह्मासी जो माझा करार तो मी आठवीन."