पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९४ वेदेशी लोकांचा अंगीकार याविषयी तीन दाखले. [प्रक० १४८ याने पहिल्यांपेक्षां आधिक अशा दुसन्या चाकरांस पाठविले, यांसही यांनी तसेच केले. शेवटी तर ते माझ्या पुत्राची भीड धरतील, असे ह्मणून त्याने आपल्या पुत्राला त्यांकडे पाठविले. पण माळी पुत्राला पाहून आपसांत ह्मणाले: हा वारीस आहे, चला आपण त्याला जिवे मारूं व त्याचे वतन घेऊ. तेव्हां त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले *). यास्तव द्राक्षमळ्याचा धनी आल्यावर तो त्या माळ्यांस काय करील?" ते त्याला ह्मणालेः “तो त्या वाइटांचा मोठा नाश करील आणि जे हंगामी त्याला फळे देत जातील अशा दुसऱ्या माळ्यांस द्राक्ष- मळा सोपून देईल." येशू त्यांस ह्मणालाः “यास्तव मी तुह्मास सांगतों की, देवाचे राज्य तुह्मापासून काढले जाईल व जी प्रजा त्यांतली फळे देईल तिला मिळेल."

  • ) द्राक्षमळा इस्त्राएलातील देवाचें राज्य होय. कुंपण नियमशास्त्र आहे. द्राक्षारस

काढण्याचे जे कुंड ते देवाच्या देवळातील भक्ति करण्याचे विधि व मार्ग दर्शविते. आणि दरदर्श माळा हा भविष्यवचन होय. माळी यहूदी लोक आहेत. चाकर भविष्यवादी आणि पुत्र हा खीस्त आहे. ३. आणि येशू पुन्हां दाखला देऊन त्यांस ह्मणालाः "आकाशाचें राज्य कोणीएका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राचे लग्न केले आणि लग्नाला आमंत्रितांस बोलावण्याकरितां त्याने आपल्या चाकरांस पाठविले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसऱ्या चाकरांस पाठवितांना मटले, आमंत्रितांस सांगा, पाहा, म्या आपले जेवण तयार केले आहे, आपले बैल व पुष्टपशू कापले, आणि अवघे तयार आहे, लग्नाला चलाः ते तर हे कांहीं मनावर न घेतां कोणी आपल्या शेताला, कोणी आप- ल्या व्यापाराला गेले, आणि वरकडांनी त्याच्या चाकरांस धरून गांजले व जिवे मारले. राजा तर ऐकून रागे भरला, आणि आपली सैन्ये पाठ- वून त्याने त्या घातकांचा नाश केला व त्याचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या चाकरांस ह्मणाला, लग्न तयार आहे खरे, परंतु बोलावलेले योग्य नव्हते. यास्तव तुह्मी मागींच्या चव्हाट्यांवर जाऊन जितके तुह्मास मिळ- तील तितक्यांस लग्नाला बोलावा. मग या चाकरांनी बाहेर जाऊन जितके स्यांस मिळाले त्या सर्वांस एकवटले आणि बसणान्यांनी लग्नाची जागा भरून गेली *). मग राजा बसणान्यांस पाहायास आंत आला. तेव्हां