पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १४८] कराराच्या लोकांस बहिष्कृत करणे. २९३ शाजाला शाप देणे हे तर इस्राएल लोकांचा शेवटी नाश होणार असा न्यायसंबंधी निर्णय दर्शवीत आहे. +) येशूच्या नांवाने जी प्रार्थना ती अप्रतिबंधक प्रार्थना होय, असे वचन आहे. योह०१६, २३. तुम्ही वापाजवळ जे काही माझ्या नावाने मागाल तें तो तमास देईल). येशच्या नावाने तर प्रार्थना ती कसी ? असे जर विचारले, तर ती प्रार्थना आपल्या नांबावर, आपल्या योग्यतेवर किंवा आपल्या पुण्यावर नाही, पण सीस्तावर विश्वास ठेव- ज्याने त्याजकडून जो उद्धार झाला त्याजवर टेकावे आणि त्याच्या शरीररूप मंडळीचे अवयव असतो खीरताकडून प्रेरित होऊन प्रार्थना करावी है येशूच्या नावाने प्रार्थना करणे असे आहे. असी जी प्रार्थना ती केवळ आमची प्रार्थना नव्हे तर सीस्ताची ग्रार्थना असून अप्रतिबंधक आहे. अशा प्रार्थनंत मानवी इच्छा व ईश्वरी इच्छा पूर्णपणे एकत्र होती आणि ही प्रार्थना डोंगरही उपटून दुसरीकडे ठेवील, म्हणजे जे असाध्य में तिला साध्य होते. प्रक० १४८. कराराच्या लोकांस बहिष्कृत आणि विदेशी लोकांचा अंगीकार याविषयों तीन दाखले. (मात्थी २१ व २२. मार्क १२. लूका २०.) १. आणि येशू दाखले देऊन यहूद्यांस ह्मणालाः "तुह्मास कसे वाटते? एका माणसाला दोन पुत्र होते, तो पहिल्याकडे जाऊन बोलला मुला, आज माझ्या द्राक्षमळ्यांत जाऊन काम कर. पण त्याने उत्तर दिले की मी नाहीं जात; तरी काही वेळाने तो पस्तावून गेला. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच मटले, त्याने उत्तर दिले की, महाराज, जातो, परंत गेला नाही. या दोघांतून कोणत्याने बापाच्या आज्ञेप्रमाणे केले"? ते त्याला ह्मणाले: “पहिल्याने.” येशूने त्यांस मटले: "जकातदार व पापी देवाच्या राज्यांत तुमच्यापुढे जातात.” २. अणखी येशूने मटले: "कोणी मनुष्याने द्राक्षमळा लावला व त्याभोवते कुंपण घातले व त्यांत द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला: आणि तो माळ्यांस सोपून देऊन आपण बहुतकाळ प्रवासास गेला. तर फळांचा हंगाम आला, तेव्हां त्याची फळे घेण्याकरितां त्याने आपल्या जाकरांस माळ्यांकडे पाठविले. तेव्हां माळ्यांनी त्याच्या चाकरांस धरून कोणाला मारले, कोणाला ठार केले, कोणाला धोडमार केला. पन्हा