पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९२ वाळलेले अंजिराचे झाड. प्रक० १४७ चौरंग व खबुत्रे विकाणायांच्या बैठकी उलट्या करून त्यांस सांगितलेः . "माझें घर प्रार्थनेचे घर ह्मणतील, असे लिहिले आहे, पण तुझी ते लुटायांची गुहा असे केले आहे"(प्रक० ११२ क० २ पाहा). मग अंध- ळे व लंगडे देवळांत त्याजकडे आले आणि त्याने त्यांस बरे केले. पण याने केलेले चमत्कार पाहून आणि देवळांत लेकरें "दावींदाच्या पुत्राला होसान्ना" असे ओरडतांना ह्मणत आहेत, हे पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले आणि त्याला ह्मणालेः "ते काय बोलतात हे ऐकतोस काय?" येशूने त्यांस मटले: “होय! बाळके व तान्हीं यांच्या तोडांतून खा प्रशंसा साधली आहे, हे तुह्मी कधी वाचलें नाहीं काय ?" (गीत ८,२.) नंतर तो त्यांस सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. प्रक० १४७. वाळलेले अंजिराचे झाड. (मात्थी २१. मार्क ११.) सकाळी (सोमवारी) येशू नगरास पुन्हा जातांना त्याला भूक लागली. आणि अंजिराच्या झाडावर पाने होती हे दुरून पाहून कदाचित् त्यावर कांहीं तरी मिळेल असे समजून तो त्याकडे गेला, परंतु पानांवांचून त्याला कांही मिळाले नाही. मग त्याने त्याला मटले. “यापुढे तुला फळ कधी न येवो!*) मग दुसऱ्या दिवसी पाहटेस ते त्या अंजिराच्या झाडाजवळून जात असतां ते मुळांपासून वाळले असे त्यांनी पाहिले. तेव्हां पेतराला अठवण होऊन तो त्याला ह्मणालाः "हे गुरू, पाहा, खा अंजिराच्या झाडाला शाप दिलाते वाळून गेले." येशने त्यांस ह्मटले: “देवावर विश्वास ठेवा. मी तुह्मास खचीत सांगतो, जो कोणी या डोंगराला तूं उपटून समुद्रांत टाकले जा, असे ह्मणेल आणि आपल्या अंतःकरणांत संशय न धरितां जे आपण ह्मणतो ते घडेल, असा विश्वास धरील, तो जे जे ह्मणेल ते त्याला घडेल. यामुळे मी तुह्मास सांगतों कीं, प्रार्थना करते वेळेस जे कांहीं तुह्मी मागाल ते सर्व तुह्मास मिळेल, असा विश्वास धरा, ह्मणजे ते तुह्मास घडेल"t)..

  • ) हे अंजिराचं झाड यहदी लोकांची उपमा आहे. प्रभने त्या लोकांस बहुत काळपर्यंत

मोठ्या काळजीने व आस्थेने बागरिलें, तरी जेव्हा तो त्यांमध्ये फळ शोधायास भाला, तेव्हा त न मिना केवळ पानाप्रमाणे पायाकारी मांगोंगें त्याला आदळली. गाजराच्या