पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १४५] बेयानी एथे येशूला सुगंध तेल लावणे. २८९ "हे प्रभु , मला दिसावे." तेव्हां येशू त्याला ह्मणाला : “तुला दिसावें, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे."-आणि येशू यरहिामधून जात होता तेव्हां पाहा, जाक्खी नामें कोणी माणूस तेथें होता, तो जकातदारांतला मख्य आणि धनवान होता. त्याने येशू कसा कोण आहे हे पाहायास यत्न केला, परंतु दाटीमुळे त्याचे चालेना, कांकी तो ठेंगणा होता. तेव्हां तो पुढे धांवत उंबरावर चढला; आणि त्या ठिकाणी आला तेव्हां येशने दृष्टि वर करून त्याला पाहिले व त्याला ह्मटले : "जाक्खी, लवकर उतर, कांकी आज तुझ्या घरी मला राहायाचे आहे." मग साने लवकर उतरून आनंदाने त्याला घरी आणले, तेव्हां सर्व पाहून कुरकुर करूं लागले की, पापी माणसाच्या घरीं उतरायास गेला आहे. मग जाकखी उभा राहून प्रभूला ह्मणाला : “प्रभू पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरियांस देतो आणि जर कुभांडाने कोणाचे कांहीं घेतले असेल तर चौपट परत देतो." तेव्हां येशू ह्मणाला : “आज या घराला तारण मिळाले, कांतर हाही अब्राहामाचा पुत्र आहे. कारण जे हरपलेले ते शोधायास व तारायास मनुष्याचा पुत्र आला आहे." प्रक० १४८. बेथानी एथे येशूला सुगंध तेल लावणे. (मात्थी २६. मार्क १४. योह० १२.) वल्हांडण सणाच्यापूर्वी सहा दिवस येशू बेथानीस आला. आणि जो मेला होता. ज्याला त्याने मेलेल्यांतून उठविलें तो लाजार तेथें होता. तेव्हां त्यांनी तेथे शिमोन जो कोडी त्याच्या घरी येशूसाठी जेवणावळ केली आणि मार्था सेवा करीत होती, पण लाजार त्याच्यासंगती बसणाऱ्यांतील एक होता. तेव्हां मारयेने खरा नार्द नामै मोलवान सुगंध तेल*) शेरभर घे- उन येशच्या पायांस लावले,आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले,आणि मा ती सगंध तेलाची अलबास्त्र कुपी फोडून त्याच्या डोक्यावर ते ओतले. या सगंध तेलाच्या वासाने तर घर भरून गेले. तेव्हां कित्येक आपणां- ये रागे भरून ह्मणालेः "हा नाश कशाला?" आणि त्याच्या शिष्यांतील कायदा इस्कारयोते तो बोललाः "हे सुगंध तेल पाउणशे रुपयांस का दरिद्यांस कां दिले नाही?" "याला दरिद्यांची चिंता होती झणन हे बोलला असे नाही, तर तो चार होता आणि त्याच्याजवळ कसणी 37 ॥