पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ यरीहो एथील अंधळा. जाक्खी. प्रक० १४४ बोललाः “हे बापा, बा माझे ऐकले ह्मणून मी तुझा उपकार मानतो!" आणि असे बोलून तो मोम्याने ओरडलाः “लाजारा, बाहेर ये?" तेव्हां जो मेला होता तो बाहेर आला, त्याचे पाय व हात वेष्टणांनी बांधलेले होते येशूने त्यांस ह्मटलेः "त्याला मोकळे करा व जाऊं द्या." . ४. तेव्हां ज्या यहूद्यांनी मारयेकडे येऊन येशूने केलेली काम पाहिली त्यांतून बहुत त्याजवर विश्वासले. पण त्यांतून कित्येकांनी परोश्यांकडे जाऊन येशूने केलेली कामे त्यांस सांगितली. यावरून त्यांनी सभा मिळ- वून मटले: “आपण काय करतो? तो माणूस बहुत चमत्कार करतो. आह्मी त्याला असे असूं दिले, तर सर्व त्याजवर विश्वासतील, मग रोमी लोक येऊन आमचे ठिकाण व राष्ट्रही घेतील." त्यांतील एक तर कायफा नामें त्या वर्षी मुख्य याजक होता, तो त्यांस ह्मणाला: "तुह्मी काही जाणत नाहीं आणि लक्षात आणीत नाहीं की, लोकांकरितां एका माणसाने मरावें आणि सर्व राष्ट्राचा नाश होऊ नये हे आह्मास उपयोगी आहे.” हे तर तो आपल्या आपण बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता, ह्मणून त्याने भविष्य सांगितले की, येशू या राष्ट्राकरितां मरणार आहे; आणि त्या (इस्राएल) राष्ट्राकरितां असें केवळ नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या लेकरांसही एकत्र मिळवावे. तर त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा मनसोबा केला, आणि तो कोठे आहे असे जर कोणाला कळले असेल तर त्याला धरण्याकरिता त्याने सूचना करावी असी आज्ञा त्यांनी केली. प्रक० १४४. यरीहो एथील अंधळा. जाकरखी. ( मात्थी २०. मार्क १०. लूका १८ व १९.) आणि असे झाले की, येशू यरीहोजवळ आल्यावर कोणी बार्तीमी नामक अंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. आणि येशू जवळून जात आहे हे ऐकून तो ओरडत बोलला : “हे येशू, दावीदाच्या पुत्रा (मशीहा), मजवर दया कर!" तेव्हां त्याने उगेच राहावे ह्मणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दबाविले, पण तो अधिकच ओरडला की: “ हे दावीदाच्या पुत्रा, मजवर दया कर!" तेव्हां येशूने उभे राहून त्याला विचारले: “म्या तुजसाठी काय करावे ह्मणून मागतोस?" तो बोलला: