पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८७ प्रक० १४३] लाजाराला मेलेल्यांतून उठविणे. यास जातो. आणि मी तेथे नव्हतो ह्मणून तुह्मामुळे मी आनंद करतो, यासाठी की तुह्मी विश्वास धरावा; तर आपण त्याकडे जाऊं." २. मग येशू आल्यावर त्याला कबरीत ठेवून चार दिवस झाले असे समजला. आणि मार्था व मारया यांचे भावाविषयी शांतवन करावे ह्मणन यहृद्यांतील बहुत लोक त्यांच्याकडे आले होते. तर येशू आला है ऐकतांच मार्था जाऊन त्याला भेटली, पण मारया घरांत बसून राहिली. तेव्हां मार्था येशूला ह्मणाली: "प्रभू, तूं एथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. तरी आतां जे कांहीं तूं देवाजवळ मागसील ते देव तुला देईल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला मटले: “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था ह्मणाली: "शेवटल्या दिवसी पुन्हा उठण्याच्या वेळेस तो पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे." येशूने तिला झटलें: "पन्हा उठणे व जीवन मी आहे, जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी वांचेल; याचा तुला विश्वास आहे काय ?" ती त्याला ह्मणालीः 'होय प्रभू, जो देवाचा पुत्र खीस्त जगांत येणार होता तोच तुं आहेस, असा मला विश्वास झालेला आहे." असे बोलून ती निघाली व आपली बहीण मारया इला एकांती बोलून ह्मणाली: “गुरु आला आहे व तुला बोलावितो." हे ऐकतांच ती लवकर उठून त्याकडे आली. येशू तर तोवर गांवांत आला नव्हता. ____३. मग मारया जेथे येशू होता तेथे आल्यावर त्याला पाहून त्याच्या पायां पडली व त्याला ह्मणालीः "प्रभू, तूं एथे असतास तर माझा भाऊ मेला नसता." तेव्हां येशू तिला रडतां पाहून आस्यांत कन्हला व व्याकुल होऊन बोललाः "तुह्मी त्याला कोठे ठेवले." त्यांनी त्याला ह्मटले. "प्रभ, येऊन पाहा." येशू रडला. तेव्हां यहूदी बोलले “पाहा याची त्याजवर केवढी प्रीति होती; पण त्यांतील कित्येक ह्मणाले: “ज्याने अंधळ्याचे डोळे उघडिले त्याला हा मरूं नये असेंही करण्याची शक्ति नव्हती काय?" इतक्यांत येशू कबरेकडे आला. तेव्हां मेलेल्याची बहीण मार्था त्याला प्रणाली: “प्रभ, आतां त्याला घाण आली असेल, कारण चार दिवस झाले आहेत." येशूने तिला झटले: “जर तूं विश्वास धरसील, तर देवाचा महि- सपाहसील असे म्या तुला सांगितले की नाही?" मग तो मेलेला ठेवला होता. तेथून त्यांनी धोड काढली. येशू तर आपली दृष्टि वर करून