पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८६ लाजाराला मेलेल्यांतून उठविणे. प्रक० १४३ अकराव्या तासी बाहेर जाऊन त्याने दुसरे रिकामे राहिलेले पाहिले आणि त्यांस मटले: तुह्मी सारा दिवस एथे रिकामे कां उभे राहिला? ते ह्मणाले: आमास कोणी मोलाने लावलें नाहीं ह्मणून. त्याने त्यांस ह्मटले तुह्मीही द्राक्षमळ्यांत जा; आणि जे योग्य ते तुह्मास मिळेल:--मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला ह्मणालाः कामकांस बोलाव, आणि शेवटल्यांपासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांस मजुरी दे. तेव्हां अकराव्या तासचे आल्यावर त्यांतील एकएकाला पावला पावला मिळाला. मग पहिले येऊन आपणांस ज्यास्ती मिळेल असे त्यांनी मनांत आणले, परंतु त्यांतीलही एकएकाला पावला पावला मिळाला. आणि त्यांनी घरधन्यापासीं कुरकुर करून ह्मटले, या शेवटल्यांनी एकच तास काम केले, आणि आमी दिवसभर उन्हातान्हांत कष्ट केले असतां बा आह्मास व त्यांस बरोबर लेखले आहे. पण त्यांतून एकाला त्याने मटले: “गड्या, मी तुझा अन्याय करीत नाहीं; खा मजसी पावल्याची बोली केली नाही काय? तूं आपले घेऊन चल! पण जसे तुला तसे या शेवटल्यांलाही द्यावे असी माझी खुशी आहे. माझे जे आहे त्याविषयी मी आपल्या मर्जीप्रमाणे करायास मुखत्यार नाहीं काय? मी चांगला आहे ह्मणून तुझा डोळा वाईट आहे काय? याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील; कारण बोलाविलेले बहुत आहेत, पण निवड - लेले थोडके." प्रक० १४३. लाजाराला मेलेल्यांतून उठविणे. (योहा० ११.) - १. बेथानी गांवांतला लाजार नामें कोणी एक माणूस रोगी होता. तेव्हां मार्था व मारया नामक त्याच्या बहिणींनी येशला सांगून पाठविलें की: "हे प्रभू, ज्यावर तूं प्रीति करतोस तो रोगी आहे." ते ऐकून येशू ह्मणालाः "हा रोग मरणासाठी नाही,तर याकडून देवाच्या पुत्राचा महिमा व्हावा ह्मणून देवाच्या महिम्यासाठी आहे." येशू तर मार्था व तिची बहीण व लाजार यांवर प्रीति करीत असे. मग तो रोगी आहे हे ऐकिल्यानंतर येशू जेथें होता त्या ठिकाणी दोन दिवस राहिला. त्यानंतर तो शिष्यांस ह्मणालाः "आमचा मित्र लाजार मेला आहे; परंतु मी त्याला उठवा-