पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ तरुण धनवान [प्रक० १४१ ह्मणाला: "बाळके माझ्याजवळ येऊ द्या, त्यांस मना करूं नका, कारण देवाचे राज्य असल्यांचे आहे! मी तुह्मास खचीत सांगतो की, जो कोणी देवाचे राज्य बाळकासारखें घेत नाहीं तो त्यांत जाणारच नाही.” तेव्हां त्याने त्यांस कंवटाळून धरून त्यांवर हात ठेवून त्यांस आशीर्वाद दिला. प्रक० १४१. तरुण धनवान. (माथी १९. मार्क १०. लूका १८.) १. नंतर पाहा, कोणी एका अधिकाऱ्याने येशूजवळ येऊन झटलें: "हे उत्तम गुरू, सर्वकाळचे जीवन मिळावे ह्मणून म्या कोणते चागले काम करावे?" येशू त्याला ह्मणाला : “मला उत्तम कां ह्मणतोस? एक जो देव यावांचून कोणी उत्तम नाहीं *). पण तुला जीवनांत जायाचें असले तर आज्ञा पाळ.” तो ह्मणालाः "कोणत्या?" येशूने मटले: “हत्या करूं नको; व्यभिचार करूं नको; चोरी करूं नको; खोटी साक्ष देऊं नको; आपल्या आईबापांचा सन्मान कर आणि जसी आपणावर तसी आपल्या शेजा-यावर प्रीति कर." तो तरुण त्याला ह्मणाला : “म्या आपल्या लहानपणापासून हे अवघे पाळले आहे, तर आता माझ्याठायीं काय उणे आहे?"]). येशूने त्याकडे पाहून त्याजवर प्रीति केली व त्याला मटले : “पूर्ण व्हावयाचे असले तर जा, आपली मालमत्ता विकून दरि- यांस दे, ह्मणजे आकाशांत तुला संपत्ति मिळेल; आणि चल, खांब उचलून घेऊन माझ्या मागे ये." पण तो तरुण ही गोष्ट ऐकून खिन्न होऊन दु:खाने निघाला, कां की, त्याची बहुत मालमत्ता होती +). येशू तर ह्मणालाः "धनवानांस देवाच्या राज्यांत जायाला किती कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यांत जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे सोपे आहे".** ). तेव्हा त्याचे शिष्य हे ऐकून ह्मणाले : "तर तारण कोण पावेल?" येशूने मटले: “माणसांस हे होत नाही,पण देवाला सर्व होते."

  • ) हा तरुण आपणाला उत्तम असे मानीत होता, तर उत्तम वाणजे काय, हे त्याला

समजविण्याची रवीस्ताची इच्छा होती. दुसऱ्या गुरुप्रमाणेच खीस्त हा मनुष्यांपैकी एक गुरु आहे, असं त्या तरुण मनुष्याला वाटले होते, आणि असेंच जर केवळ असले नर "उत्तम" हे विशेषण येशलाही योग्य नव्हते.