पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८३ प्रक० १४०] येशू लेकरांचा मित्र. निवडलेले रात्रंदिवस त्याला हाक मारतात त्यांविषयी त्याने सहन केले असतांही त्यांचा न्याय करणार नाही काय? मी तुझास सांगतो की तो त्यांचा न्याय लवकर करील." ३, तर ज्या कित्येकांनी आपण न्यायी आहों असा आपला भर- वसा धरून, दुसऱ्यांस धिक्कारले, त्यांस त्याने हा दाखला सांगितला की, "दोघे मनष्य प्रार्थना करायास देवळांत गेले, त्यांतील एक परोशी व एक जकातदार, परोश्याने उभे राहून आपल्या मनांत असी प्रार्थना केली. हे देवा, दुसरी माणसे अपहारी, अन्यायी, व्यभिचारी यांसारखा, किंवा या जकातदारासारखाही मी नव्हे, ह्मणून मी तुझा उपकार मानतो. दर आठवड्यांत मी दोनदां उपास करतो, जे कांहीं मला मिळते त्या अवघ्याचा दहावा भाग देतो.- जकातदार तर दूर उभा राहून आकाशाकडे राष्टिदेखील वर लावायास धजत नसतां आपल्या उरावर मारून बोलला: हे देवा, मज पाप्यावर दया कर!" मी तुह्मास सांगतो, हा दुसऱ्यापेक्षा न्यायी ठरून आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करील तो नीच होईल, आणि जो आपणाला नीच करील तो उंच होईल." प्रक० १४०. येशू लेकरांचा मित्र. (माथी १८ व १९. मार्क ९ व १०. लूका ९व १८.) त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन ह्मणाले: “आकाशाच्या राज्यांत मोठा कोण असेल? तेव्हां येशूने बाळक बोलावून त्याला त्यांच्यामध्ये ठेवले आणि हटले: “मी तुझास खचीत सांगतो, जर तुह्मी पालटून बाळकांसारखे होणार नाही तर तुह्मी आकाशाच्या राज्यांत जाणारच नाही, जो कोणी आपणाला या बाळकासारखा लीन करतो, तो आकाशाच्या राज्यांत मोठा होय. आणि जो कोणी माझ्या नामाने या बाळकाला अंगीकारतो तो मला अंगीकारतो. संभाळा, या लहानांतील एकाचाही धिकार करूं नका. कारण मी तुह्मास सांगतों की, आकाशांत यांचे दूत माझ्या आकाशांतील बापाचे तोंड निरंतर पाहतात. ह्मणून या लहानांतील एकाचा नाश व्हावा असी तमच्या आकाशांतील बापाची इच्छा नाहीं."- तेव्हां त्यांजवर त्याने हात ठेवन प्रार्थना करावी ह्मणून त्याजकडे बाळके आणली, पण शिष्यांनी आणणान्यांस दबाविले. ते पाहून येशूला वाईट वाटले, आणि तो त्यांस