पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ प्रार्थना करण्याविषयी दाखले. प्रक० १३९ मोशे व भविष्यवादी आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. मग तो बोलला: हे बापा अब्राहामा, असे नको, तर कोणी मेलेल्यांतून त्यांकडे गेला ह्मणजे ते पश्चात्ताप करतील. पण अब्राहामाने त्याला झटले : जर ते मोश्याचे व भविष्यवाद्यांचे ऐकत नाहीत, तर मेलेल्यांतूनही जरी कोणी उठला, तरी त्यांची खातरी होणार नाही.” प्रक० १३२. प्रार्थना करण्याविषयी दाखले. (लूका ११ व १८.) १. येशूने आपल्या शिष्यांस मटले: “तुह्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असतां तो त्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला ह्मणेल: मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र वाटेतून मजकडे आला आहे,आणि त्याला वाढायाला मजपासीं कांहीं नाही. आणि तो आंतून उत्तर देईल की, मला श्रम देऊं नको, आतां दार लावले आहे व माझी मुले मजजवळ अंथरुणावर आहेत, माझ्याने उठून तुला देववत नाहीं. मी तुह्मास सांगतो, तो त्याचा मित्र आहे यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाहीं तरी त्याच्या आग्रहामुळे उठून त्याला पाहिजेत तितक्या देईल. -तुह्मामध्ये कोण असा बाप आहे की, त्याजवळ पुत्राने भाकर मागितली असता त्याला धोंडा देईल? आणि मासा मागितला असतां माशाच्या बद्दल त्याला साप देईल? तर तुह्मी वाईट असतां आपल्या लेकरांस चांगली देणी द्यायास समजतां, मग आकाशांतील बापाजवळ जे मागतात सांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल? २. अणखी सर्वदां प्रार्थना करावी व खचूं नये, याविषयी त्याने त्यांस असा दाखला दिला की : "कोणी एका नगरांत कोणी न्यायाधीश होता, तो देवाचे भय धरीत नसे आणि माणसाची भीड राखीत नसे, त्याच नगरांत तर कोणी एक विधवा होती, ती त्याकडे येऊन बोलली: माझ्या वाद्याविषयी माझा न्याय कर, आणि काही वेळपर्यंत तो करीना; पण शेवटी त्याने आपल्या मनांत पटले, मी देवाचे भय धरीत नाही आणि माणसाची भीड राखीत नाही, तरी ही विधवा मला श्रम देती, यामुळे मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन मला त्रास देईल." प्रभूने मटले : "अन्यायी न्यायाधीश काय ह्मणतो हे ऐका! तर देवाचे जे