पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रा० १३८] धनवान माणूस आणि दरिद्री लाजार. २८२ ह्मणून वा मला कधीं करडूंही दिले नाही. पण ज्याने तुझी संपत्ति उधळेपणाने खाऊन टाकली तो हा तुझा पुत्र आला, तेव्हां वा त्यासाठी माजलेले वासरूं कापले आहे. बापाने त्याला झटलें: मुला, तूं सर्वदां मजसंगती आहेस, आणि माझी सर्व मालमत्ता तुझीच आहे; पण हर्ष व आनंद करावा हे योग्य होते, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो पुन्हां जिवंत झाला आहे, आणि हरपला होता तो सांपडला आहे." प्रक० १३८. धनवान माणस आणि दरिद्री लाजार, (लूका १६.) येशू ह्मणालाः "कोणी एक धनवान माणूस होता, तो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्त्रे घालीत असे व प्रतिदिवसी डौलाने खुशाली करीत असे. आणि लाजार नामे कोणी एक दरिद्री होता, त्याला बहुत फोड' असतां तो त्याच्या दरवाज्याजवळ पडला होता; आणि धनवा- नाच्या मेजावरून जो चूर पडे सावर आपले पोट भरावे असी त्याची इच्छा होती. अणखी कुत्रींही येऊन त्याचे फोड चाटीत असत. मग असे झाले की तो दरिद्री मेला, आणि दूतांनी त्याला अब्राहामाच्या उरासी नेवन ठेवले. धनवानहीं मेला आणि त्याला पुरले. आणि अधो- लोकांत पीडा भोगीत असतां त्याने आपले डोळे वर करून अब्राहाम आणि त्याच्या उरासी लाजार यांस दुरून पाहिले. मग तो हाक मारून बोललाः हे बापा अब्राहामा, मजवर दया कर, आणि लाजाराने आपल्या बोटाचे अग्र पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी ह्मणून त्याला पाठीव, कांतर या जाळांत मी क्लेशित आहे. अब्राहाम बोलला, मुला, तूं आपल्या आयुष्यांत आपले सुख भरून पावलास, आणि त्याप्रमाणे लाजार दुःख पावला है अठीव, आतां तर हा समाधान पावला पण तूं क्लेश भोगतोस. आणि या सर्वांवर आमच्या व तुमच्यामध्ये मोठा चर स्थापला आहे. असा की जे एथून तुह्माकडे पार जाण्यास पाहतात त्यांनी जाऊं नये. आणि तिकडून त्यांनी आमाकडे येऊ नये. मग तो बोलला, तर बापा. मी तुला विनंती करतो की, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठीव: कां तर मला पांच भाऊ आहेत; सांस त्याने यासाठी साक्ष द्यावी की. त्यांनी या पीडेच्या जागेत येऊ नये. अब्राहामाने त्याला मटले: त्यांजवळ 36॥