पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० उधळ्या पुत्र याचा दाखला. प्रक० १३७ २. मग येशू बोललाः "कोणी एका माणसाला दोन पुत्र होते, त्यांतील धाकटा बापाला ह्मणालाः बापा, जो मालमत्तेचा वांटा मला यायाचा तो दे, मग त्याने त्यांस संपत्ति वांटून दिली. आणि थोडक्या दिवसांनी धाकटा पुत्र सर्व जमा करून दूर देशांत गेला आणि तेथे उधळेपणाने वागून त्याने आपली संपत्ति उडविली. मग अवघे खर्चल्यावर त्या देशांत मोठा दुकाळ पडला आणि त्याला अडचण पडू लागली. तेव्हां तो त्या देशां- तील एका गृहस्थाजवळ जाऊन राहिला. त्याने तर त्याला डुकरें चारा- यास आपल्या शेतांत पाठविले, तेव्हां डुकरें ज्या शेंगा खात असत त्यांवर आपले पोट भरावे असे त्याला वाटले, आणि कोणी त्याला काही दिलें नाहीं. मग तो शुद्धीवर येऊन ह्मणालाः माझ्या बापाच्या किती मोलक- यांस भरपूर भाकर आहे? पण मी भुकेने मरतो? मी उठून आपल्या बापा- कडे जाईन व त्याला ह्मणेन, बापा, म्या आकाशाच्या विरुद्ध व तुझ्या समोर पाप केले आहे. यापुढे तुझा पुत्र ह्मणवायास मी योग्य नाही, आपल्या एका मोलकल्याप्रमाणे मला ठेव, तेव्हां तो उठून आपल्या बापाकडे गेला. पण तो दूर आहे इतक्यांत त्याचा बाप त्याला पाहून कळवळला, आणि धांवून त्याच्या गळ्यांत त्याने मिठी घातली व त्याचे चुंबन घेतले. मग पुत्र त्याला ह्मणालाः बापा, आकाशाच्या विरुद्ध व तुझ्या समोर म्या पाप केले आहे, आणि यापुढे तुझा पुत्र ह्मणवायास मी योग्य नाही. पण बा- पाने आपल्या चाकरांस सांगितले: उत्तम झगा आणून त्याला घाला, आणि याच्या हातांत अंगठी व पायांत जोडे घाला, आणि माजलेले वासरूं आणून कापा, आणि आपण खाऊन हर्ष करूं; कांकी हा माझा पुत्र मेला होता तो पुन्हां जिवंत झाला, आणि हरपला होता तो सांपडला आहे. तेव्हां ते हर्ष करू लागले. त्याचा वडील पुत्र तर शेतांत होता, तो येऊन घराजवळ पोहंचल्यावर त्याने वाद्य व नाच ऐकिले. आणि चाकरांतील एकाला बोलावून त्याने विचारले; हे काय आहे ? त्याने त्याला मटले: तुझा भाऊ आला आहे, आणि तो तुझ्या बापाला सुखरूप मिळाला ह्मणून त्याने माजलेले वासरूं कापले आहे. मग तो रागे भरून आंत जाई ना; ह्मणून त्याचा बाप बाहेर येऊन त्याला समजावू लागला. पण त्याने बापाला उत्तर दिले की: पाहा, मी इतकी वर्षे तुझी चाकरी करतो आणि तुझी आज्ञा म्या कधीही मोडली नाही. तरी म्या आपल्या मित्रांबरोबर खुशाली करावी