पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १३७] येशू प्रीतीने पापी लोकांस शोधितो. २७९ केले, ते कोणाचे होईल ? -जो आपणासाठी द्रव्य सांचवितो व देवा- करितां धनवान नाहीं, तो तसाच आहे." २. अणखी हा दाखला त्याने त्यांस सांगितलाः कोणी एकाच्या द्राक्ष- मळ्यांत अंजिराचे झाड लावले होते, तो त्यावर फळ पाहयास आला; परंत त्याला मिळाले नाही. मग त्याने माळ्याला झटले : “पाहा, तीन वर्षे या अंजिरावर फळ पाहयास येतो परंतु मला मिळत नाही, ते तोडून टाक! उगीच भूमीला भार कां असावा?" पण माळ्याने झटलेः "महा- राज, यंदाही ते असू दे, मणजे मी त्याभोवतें खणीन व खत घालीन: मग फळ दिले तर बरे, नाही तर मग ते तोडून टाकावें." प्रक०१२७. येशू प्रीतीने पापी लोकांस शोधितो आणि त्यांच्या पापांची क्षमा करितो याविषयों दाखले. (लूका १५.) १. मग सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकायास त्याकडे आले. तेव्हां परोशी यांनी कुरकुर केली की: “हा पाप्यांस अंगीकारतो व त्यां- बरोबर खातो." त्या वेळेस त्याने त्यांस हा दाखला दिला की: "तुह्मांतील असा माणूस कोण आहे, की त्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरपले, तर ती ९९ रानांत सोडून हरपलेले सांपडे, तोपर्यंत त्याच्या शोधास जात नाही आणि सांपडल्यावर तो आनंद करून ते आपल्या खांद्या- बर घेतो, आणि घरी येऊन मित्रांस व शेजाऱ्यांस बोलावून त्यांस ह्मणतो. माझे हरपलेले मेंढरूं सांपडले ह्मणून मजसंगतीं आनंद करा.--अथवा असी बायको कोण आहे की, आपल्या जवळ दहा पावल्या असतां त्यांतून एक पावली हरवली, तर दिवा लावून व घर झाडून ती सांपडे तोपर्यंत मन लावून शोध करीत नाही? आणि सांपडल्यावर ती मित्रांस व शेजाऱ्यांस बोलावून ह्मणती, जी पावली मजपासून हरवली ती मला सांपडली, म्हणन विसंगती आनंद करा.- तसे मी तुह्मास सांगतो, ज्यांस पश्चात्तापाची गरज नाही अशा ९९ नीतीमानपिक्षां पश्चात्ताप करणान्या एका पाप्या- विषयीं देवाच्या दूतांच्या समोर आनंद होतो."