पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ धनवान माणूस आणि अंजिराचे झाड यांचे दाखले. [प्रक० १३६

  • ) प्रारंभापासून मनुष्य घातक जो सैतान त्याने केलेले घाय लेवी व याजक (नियमशा-

स्त्र व विधिशास्त्र) यांच्याने बरे करवत नाहीत. खीस्त ते बरे करून दखणाईतांस अगदी चांगले व पवित्र करण्याकरितां पवित्र आत्म्याला सोपन देतो, यास्तव या दयाळ शोमरो- न्याचे थोर अधिरूप स्वतः खीस्त आहे. यह यांनी त्याला धिकारिलें आणि त्याला शोम- रोनी असे म्हणचिलें. २. त्यानंतर येशू बेथानी नामक गांवांत गेला. तेव्हां मार्था नामें कोणी बाईने त्याला आपल्या घरांत घेतले. आणि तिला मारया नामें बहीण होती, ती येशूच्या पायांजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती, पण मार्था त्याची सेवा करायास बहुत खटपटीमुळे गोधळली व जवळ येऊन बोलली: "प्रभू, माझ्या बहिणीने मज एकटीवर खटपटीचे काम टाकले याची तुला चिंता नाही काय? ह्मणून तिला माझें सहाय करायास सांग." येशूने तिला उत्तर दिले की, "मार्थे, मार्थे ! तूं बहुत गोष्टींविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस; पण एकाच गोष्टीची गरज आहे; मारयेने तर चांगला वांटा निवडून घेतला आहे, तो तिजपासून घेतला जाणार नाही." प्रक० १३६. धनवान माणूस आणि अंजिराचे झाड यांचे दाखले. (लूका १२. व १३.) १. आणि कोणी एकाने त्याला मटले: "हे गुरू, मला वतनाचा वाटा द्यावा ह्मणून माझ्या भावाला सांग." मग येशू त्याला ह्मणालाः "माणसा, मला तुह्मावर न्यायाधीश किंवा वांटणारा असे कोणी नेमले? संभाळा. लोभाविषयीं जपा, कांकी कोणाचेही जीवन त्याच्या पुष्कळ द्रव्याने नाहीं." मग त्याने त्यांस दाखला सांगितला की "कोणी एका धनवान माणसाच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हां त्याने आपल्या मनांत असा विचार केला की, काय करूं ? कारण माझी पिके सांठवायास मला जागा नाही. मग मटले, मी हे करीन: आपली कोठारे मोडून त्यांहून मोठी बांधीन, आणि तेथे मी आपले सर्व उत्पन्न व आपला माल सांठवीन. आणि मी आपल्या जिवाला ह्मणेन, जिवा, तुला बहुत वर्षांपुर्ता पुष्कळ माल ठेवला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर? पण देवाने त्याला मटले : मूर्खा, याच रात्री तुझा प्राण तुजजवळ मागतील; मग खा तयार