पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १३५] दयाळू शोमरोनी.-मारया आणि मार्था. २७७ चाकरावर दया करायाची नव्हती काय? तेव्हां तो आपले सर्व देणे फेडी तोपर्यंत त्याला दंड करणान्यांच्या हाती दिले. जर तुह्मी आपल्या अंतःकरणापासून आपापल्या भावांच्या अपराधांची क्षमा करीत नाही, तर माझा आकाशांतील बापही तुह्मास तसे करील." प्रक० १३८. दयाळू शोमरोनी.-मारया आणि मार्था. (लूका १०.) १. मग कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहाण्या- करितां बोलला: "हे गुरू, मी काय केल्याने सर्वकाळच्या जीवनाचा वारीस होईन." त्याने त्याला ह्मटले: “नियमशास्त्रांत काय लिहिले आहे, तूं कसे वाचतोस?" त्याने उत्तर दिले की: “तुझा देव प्रभु यावर तूं आपल्या सर्व अंत:करणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व मनाने प्रीति कर, आणि जसी आपणावर तसी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर." मग याने त्याला झटले: “ठीक उत्तर केलेस, हे कर, मणजे जीवन पावसील." तेव्हां आपण न्यायी ठरावे असे मनावर धरून तो येशला ह्मणालाः “तर माझा शेजारी कोण?” येशूने त्याला उत्तर देऊन झटले: “कोणी माणूस यरूशलेमापासून यरीहोस खाली जात असतां लुटान्यांमध्ये सांपडला, ते त्याला उघडे करून मार देऊन स्याला अर्धमेला असे सोडून गेले. मग कोणी याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता, तो त्याला पाहून दुस-या बाजूने चालन गेला, आणि तसेच कोणी लेवीनेही केले. पण कोणी शोमरोनी वाटेने चालत असतां त्याजकडे आला व त्याला पाहून कळवळला, तेव्हां जवळ जाऊन त्याने तेल व द्राक्षारस लावून त्याचे घाय बांधले, मग त्याला आपल्या पाठाळावर बसवून धर्मशाळेत आणले आणि त्याचा संभाळ केला. आणि दुसऱ्या दिवसी निघते वेळेस दोन पावल्या काढून धर्मशाळकऱ्याला देऊन त्याला सांगितले की, याचा संभाळ कर, आणि यापेक्षा जे कांहीं अधिक खर्चसील ते मी माघारै आल्यावर तुला भरून ईन *). तर या तिघांतून लुटायांमध्ये सांपडलेल्याचा शेजारी तुझ्या मताने कोणता झाला?" शास्त्री बोललाः "त्याजवर दया करणारा तो." येशने त्याला मटले: "तू जाऊन तसेच कर."