पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ कोटी रुपयांचा ऋणकरी. [प्रक० १३४ प्रक०१३४. कोटी रूपयांचा ऋणकरी. (मात्थी १८. लूका १७.) आणि येशूने शिष्यांस मटले: “अडखुळे न यावे हे घडत नाही. तथापि ज्याकडून ते येतात त्याला हाय. त्याने या लहानांतील एकाला अडखळवावें यापेक्षा त्याच्या गळ्यांत जांत्याची तळी बांधून त्याला समु- द्रांत टाकावे, हे त्याला बरे आहे. आपणांस संभाळा ! तुझ्या भावाने तुझा अन्याय केला तर त्याचा दोष याला दाखीव, आणि जर तो पश्या- त्ताप करील तर त्याची क्षमा कर. आणि त्याने एका दिवसांत सात वेळां तुझा अन्याय केला आणि त्या दिवसांत सात वेळां तुजकडे परत येऊन मी पश्चाताप करितो असें ह्मणाला, तर त्याची क्षमा कर." तेव्हां पेतर ह्मणाला : “हे प्रभू, माझ्या भावाने माझा अन्याय किती वेळां केला असतां मी त्याला क्षमा करूं सात वेळां काय?' येशू त्याला ह्मणालाः “सात वेळां असे मी तुला ह्मणत नाही, तर सातांच्या सत्तर वेळां. यामुळे आकाशाचे राज्य कोणी एका राजासारखे आहे, त्याला आपल्या चाकरांचा हिशोब घ्यावा असे वाटले, तो घेऊ लागल्यावर कोटी रुपयांच्या एका देणेदाराला त्याकडे आणले. पण फेडायास त्याजवळ कांहीं नसतां त्याच्या धन्याने आज्ञा केली की, तो व त्याची बायको व लेकरे यांस व त्याचे जे काहीं असेल ते विकून कर्ज फेडून घ्यावे. यावर त्या चाकराने त्याच्या पायां पडून प्रार्थिले: महाराज, मला वागवून घे, ह्मणजे मी तुझे सर्व फेडीन. तर चाकराच्या धन्याला कळवळा येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याला कर्ज सोडले. पण तोच चाकर बाहेर गेल्यावर ज्याकडे त्याचे २५ रुपये घेणे होते असा एक सोबती चाकर आढळला. तेव्हां तो त्याला धरून नरडी आवळून बोलला तुजवर माझे घेणे आहे, ते फेडून टाक! यावर त्याचा सोबती चाकर त्याच्या पायां पडून त्याला विनवून ह्मणालाः मला वागवून घे, ह्मणजे मी तुझे सर्व फेडीन; पण तो ऐके ना, तर जाऊन त्याने त्याला बंदीशाळेत घातले. तेव्हां झालेल्या गोष्टी पाहून त्याचे सोबती चाकर फार खिन्न झाले, आणि त्यांनी येऊन सर्व वर्तमान आपल्या धन्याला सांगितले. तेव्हां त्याच्या धन्याने त्याला बोलावन मटले, अरे दुष्ट चाकरा, त्वा मला विन- विले ह्मणून म्या ते सर्व देणे तुला सोडले, तसी तूंही आपल्या सोबती