पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १३३] फेपरेकरी मुलगा. पट्टी देणे. लागला. मग येशूने त्याच्या बापाला पुसले की: "हे याला होऊन किती काळ झाला!" तो ह्मणालाः "बाळपणापासून ; आणि त्याने त्याचा घात करण्याकरिता त्याला बहुत वेळां अग्नीत व पाण्यात टाकले; परंतु तुझ्याने कांहीं करवेल तर आमावर करुणा करून आमचे सहाय कर!" येशू त्याला ह्मणाला: "तुझ्याने विश्वास धरवेल तर; विश्वास धरणान्याला सर्व साध्य होते. तेव्हांच त्या मुलाचा बाप डोळ्यांस आसवे आणून असे ओरडला की: "हे प्रभू , मी विश्वास धरितो, माझ्या अविश्वासाविषयी मला सहाय कर!" मग येशूने त्या अशुद्ध आस्याला धमकावून मटले: “यांतून निघ असी मी तुला आज्ञा करतो." तेव्हां आत्मा त्याला फार पिळून निघाला आणि मुलगा मेल्यासारखा झाला. पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठ- विले आणि त्याला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. नंतर घरी आल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला पुसले की: “आमच्याने याला का काढवले नाही?" येशू त्यांस ह्मणाला : “तुमच्या अविश्वासामुळे; कारण की मी तुमास खचीत सांगतो, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुह्मास असला तर तुमच्याने होणार नाही असे काही नाही," २. नंतर ते कपरणाहूमांत आल्यावर पट्टी घेणारे पेतराकडे येऊन बोलले : " तुमचा गुरू पट्टी *) देतो की नाही?" त्याने मटले : " देतो." मग तो घरांत आल्यावर येशू त्याच्या अगोदर बोलला: “ शिमोना, तुला कसे वाटते ? देशाचे राजे कोणापासून जकात व पट्टी घेतात, आपल्या पत्रांपासून किंवा परक्यांपासून?" पेतर त्याला ह्मणाला : “परक्यांपासून." येशने त्याला ह्मटले: “ तर मग पुत्र मोकळे आहेत +). पण आमी त्यांस अडखळवू नये ह्मणून तूं जाऊन समुद्रांत गळ टाक, आणि जो पहिला मासा वर येईल तो धर आणि त्याचे तोंड उघडून तुला रुपया सांपडेल, तो घेऊन मजसाठी व तुजसाठी त्यांस दे."

  • ) ही पट्टी देवळाची वार्षिक पट्टी होती, आणि ती प्रत्येक प्रौढ इस्राएली माणस यांस

देणे पडत असे. साविक पाहिले असतां खीस्त देवाचा पुत्र व मशीहाराजा असल्यामळे त्याला आपल्या बापाच्या घराची पट्टो देण्याची गरज नव्हती.