पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ फेंपरेकरी मुलगा. पट्टी देणे. [प्रक० १३२ हे त्याची जी गति तो यरूशलेमांत पूर्ण करणार होता, तिच्याविषयी यासी बोलत आहेत असे शिष्यांनी पाहिले. मग पेतर येशूला ह्मणाला: "हे प्रभू, आमी एथे असावे हे बरे आहे; तुला बरे वाटले तर आह्मी एथे तीन मंडप करूं, तुजसाठी एक व मोश्यासाठी एक व एलियासाठी एक." तो बोलत असतां तेजस्वी मेघाने त्यांवर सावली केली आणि मेघांतून असी वाणी झाली की: "हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुह्मी ऐका." तेव्हां शिष्य हे ऐकून पालथे पडले व फार भ्याले. आणि येशूने येऊन त्यांस हात लावला व ह्मटले : “उठा, भिऊनका." त्यांनी तर आपले डोळे वर करून कोणाला पाहिले नाही, येशूला मात्र पाहिले. तेव्हां त्याने त्यांस निक्षुण सांगितले की: "तुह्मी ने पाहिले ते मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठेल तोपर्यंत कोणाला कळवू नका" *). _*) मोशे व एलिया हे जुन्या करारांत मुख्य वडील आणि नियमशास्त्र व भविष्यशास्त्र यांचे प्रतिनिधि असे वर्णिले आहेत. नियमशास्त्र व भविष्यशास्त्र दुःख सोसण्याने व मरणाने पूर्ण करून नवा करार स्थापायास येश आतां प्रवृत्त झाला, झणून त्याकडे मोशे व लेया हे आले. या प्रसंगांतील खीस्ताच्या मानवी अवस्थेचे पालटणे क्षणिक होते, परंतु त्याच्या पुन्हा उठण्यांत ते परिपूर्ण व अक्षय झाले आहे. (प्रक० २६३ सू० पाहा.) ज्या डोंगरावर येशचे रूप पालटलें, तो यावोर डोंगर असावा.. प्रक० १33. फॅपरेकरी मुलगा. पट्टी देणे. (मात्थी १७. मार्क ९. लूका ९.) १. मग ते डोंगरावरून उतरून (वरकड ) शिष्यांस मिळाल्यावर कोणी एक माणूस येशूकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून बोललाः "हे प्रभू, माझ्या पुत्रावर दया कर, कांकी तो फैपरेकरी आहे व त्याला मुका आत्मा लागला आहे, तो याला जेथे कोठे धरितो, तेथे त्याला आपटून टाकतो. आणि हा तोंडाला फेंस आणून आपले दांत कडकडां खातो. आणि तुझ्या शिष्यांनी तो काढावा ह्मणून म्या त्यांस सांगितले, परंतु यांच्याने काढवेना." तेव्हां येशूने उत्तर दिले: “आहा! अविश्वासी पिढी, मी तुह्माबरोबर कोठवर राहूं ! त्याला मजकडे आणा." मग त्यांनी मुल- ग्याला त्याजकडे आणले. तेव्हां त्याला पाहतांच आस्याने मुलग्याला पिळून टाकले आणि तो भुमीवर पडून तोंडाला फेंस आणून लाळू