पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १३२] येशूविषयीं पेतराचे पत्करणे. खीस्लाचे रूपांतर. २७३ मंडळी रचीन आणि तिजवर अधोलोकाच्या दरवाज्यांचे बळ चालणार नाही. आणि मी तुला आकाशाच्या राज्याच्या किलया देईन, पृथ्वी- वर जे काहीं तूं बंद करसील ते आकाशांत बंद होईल; आणि पृथ्वीवर जे कांहीं तूं मोकळे करसील ते आकाशांत मोकळे होईल"t).

  • ) प्रेषितांमध्ये पहिला तो पेतर आहे, असे प्रभूने एथे दाखविले आहे. त्याने

इमारतरूपी खिस्ती मंडळीचा पाया घालावा, ह्मणून प्रभूने त्याला निवडून घेतले आणि हेच पाचे वरिष्ठपण आहे. +) पापापासन मोकळे करायास किंवा बंद करायास जो अधिकार रखीस्ताच्या नावाने वन्याच्या आज्ञेवरून प्रेषितांस प्राप्त झाला तो लाक्षणिक रीतीने बांधायाच्या व सोडायाच्या किल्लयांकडून दाखविला आहे. हा अधिकार प्रभूने पेतराला मान दिला असें नाहीं, जसा त्याला तसा सर्व प्रषितांसही दिला (माथी १८,२८). २. त्या वेळेपासून येशू आपल्या शिष्यांस कळवू लागला की : “म्या यरूशलेमास जाऊन बहुत दुःखे सोसावीं व मला जिवे मारावे व तिसऱ्या दिवसीं म्या पुन्हा उठावे याचे अगत्य आहे." तेव्हां पेतर त्याला घेऊन दबावं लागलाः "हे प्रभू, तुजवर दया असो, हे तुला होणार नाहीं!' पण येश मरडून पेतराला ह्मणालाः "अरे सैताना, माझ्यामागे हो, तूं मला अड- खळा आहेत, कारण तूं देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहींस, माणसा- च्या गोष्टींकडे लावतोस"). तेव्हां येशूने आपल्या शिष्यांसें झटले: “जर कोणी माझ्यामागे यायास इच्छितो तर त्याने आपणाला नाकारावे आणि आपला खांब उचलून घेऊन माझ्यामागें यावे. कांकी जो कोणी आपला जीव राखायास इच्छितो तो त्याला मुकेल; पण जो कोणी मजकरितां आपल्या जिवाला मुकेल, तो त्याला मिळवील. माणूस सगळे जग जर मिळवील पण आपल्या जिवाची हानि पावेल तर त्याला काय लाभ होईल?" ) अरे सैताना, माइया मागें हो," असें पतराला बोलल्याने त्याच्या अउखळ्याचा जाम सतानाकडन आहे असें खीस्ताने दाखविले आहे. नक्कीच पतराला देवाच्या आत्याकड़न हर्षाने येशूला पत्करण्याविषयी प्रेरणा झाली, त्याचप्रमाणे आता या रखन्याच्या बोलण्याविषयी त्याने वाईट आत्म्याला आपणास प्रेरणा करू दिली. ३. मग सहा दिवसांनंतर येशूने पेतर व याकोब व योहान्न यांस बरोबर घेऊन त्यांस उंच डोंगरावर एकीकडे नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखतां पालटले. त्याचे तोड सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे उजेडासारखी पांढरी झाली. आणि पाहा, मोशे व एलिया 35