पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १३१ चांगला मेंढपाळ, २. यावर जो माणूस अंधळा होता त्याला त्यांनी पुन्हा बोलावून मटले : "देवाला थोर मान, तो माणूस पापी आहे हे आह्मास ठाऊक आहे." त्याने उत्तर दिले: "तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाहीं. एक मला ठाऊक आहे की, मी अंधळा होतो आणि आतां पाहतो." पुन्हा त्यांनी त्याला मटले: “त्याने तुला काय केले? त्याने तझे डोळे कसे उघडिले ?" त्याने झटले : "म्या तुह्मास आतां सांगितले असतां तुह्मी ऐकिले नाही, पुन्हा ऐकायास कां इच्छितां, तुह्मीही त्याचे शिष्य व्हायास इच्छितां काय?" तेव्हां ते त्याची असी निंदा करू लागले की: "तूं त्याचा शिष्य आहेस, आमी तर मोश्याचे शिष्य आहो. देव मोश्यासी बोलला, हे आमास ठाऊक आहे, पण हा कोठला आहे हे ठाऊक नाहीं." माणसाने त्यांस मटलेः "त्याने माझे डोळे उघडिले असतां तो कोठला आहे हे तुह्मास ठाऊक नाही, हे मोठे आश्चर्य आहे." ते त्याला ह्मणाले: “तूं अगदी पापांमध्ये जन्मलास आणि तूं आमास उपदेश करतोस काय?" आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले. त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूने ऐकिले, आणि तो मिळाल्यावर त्याने त्याला मटले: “तूं देवाच्या पुत्रावर विश्वासतोस काय? त्याने उत्तर दिले की: "प्रभू, म्या त्यावर विश्वास ठेवावा ह्मणून तो कोण आहे?" येशू त्याला ह्मणालाः “तुजसीं बोलणारा तोच आहे." त्याने मटले: “प्रभू, मी विश्वासतो." आणि त्याला नमन केले. प्रक० १३१. चांगला मेंढपाळ. (योह० १०.) आणि येशू ह्मणालाः “मी तुह्मास खचीत सांगतो, जो मेंढवाड्यांत दारनि न जातां दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. पण जो दाराने आंत जातो तो मेंढरांचा पाळणारा आहे. मेंढरे त्याची वाणी ऐक- तात आणि तो आपल्या मेंढरांस नांव घेऊन घेऊन हाक मारतो. आणि तो आपली मेंढरे काढून त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चाल- तात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. मी दार आहे, मजकड़न कोणी आंत जाईल तर तो तारण पावेल *). मी चांगला मेंढपाळ जह जो चांगला मेंढपाळ तो मेंढरांकरितां आपला जीव देतो. पण मोलकरी. जो मेंढपाळ नाहीं ज्याची ती मेंढरे नाहीत, तो लांडगा येता