पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० जन्मांध माणूस. [प्रक.० १३० प्रक० १३०. जन्मांध माणूस. (योह० ९.) १. मंडप घालण्याचा सण (प्रक०४० क०२) यासाठी येशू यरूशलेमास वर गेला, आणि तेथे त्याने एक जन्मांध माणूस पाहिला. तेव्हां त्याच्या शि- प्यांनी त्याला विचारले : "गुरू, ज्या पापामुळे हा असा अंधळा जन्मला, ते कोणी केले,याने किंवा याच्या आईबापांनी?" येशूने उत्तर दिले: "याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याकडून देवाची कामे प्रगट व्हावी ह्मणून असा जन्मला." असे बोलून तो भूमीवर थुकला, मग धुक्याचा चिखल करून त्याने अंधळ्याच्या डोळ्यांवर चिखल लेपला आणि त्याला ह्मटले: “जा, शिलोह तळ्यांत धू." मग जाऊन धुतल्यावर तो पाहत आला. तेव्हां शेजारी ह्मणालेः "जो भीक मागत बसत असे तो हाच आहे ना?" कित्येक बोलले: “तोच आहे," पण दुसरे ह्मणाले "त्याच्या सारखा आहे." तो बोलला: "मी तोच आहे." तेव्हां परोश्यांनी त्याला विचारले: “तुझे डोळे कसे उघडले?" त्याने उत्तर दिले की: "येशू नामें माणसाने चिखल करून माझ्या डोळ्यांवर लेपला, मग धुतल्यावर मला दृष्टि आली." मग परोश्यांतील कित्येक ह्मणाले: "तो माणूस देवापासून नाहीं, कांकीं तो शाब्बाथ पाळीत नाही." कां तर येशने त्याचे डोळे उघडिले त्या दिवसी शब्बाथ दिवस होता. दुसरे ह्मणाले: “पापी माण- साच्याने एवढे चमत्कार कसे करवतील?" असी त्यांच्यामध्ये फूट पडली. पुन्हा ते त्या अंधळ्याला ह्मणाले: “त्याने तुझे डोळे उघडिले ह्मणून त्या- विषयीं तूं काय ह्मणतोस?" त्याने झटले: "तो भविष्यवादी आहे." तर यहूद्यांनी त्या दृष्टि पावलेल्याच्या आईबापांस बोलाविले, तोपर्यंत तो अंधळा असून दृष्टि पावला असी त्यांची त्याविषयी खातरी झाली नाही. तेव्हां त्यांनी सांस विचारले: “जो तुमचा पुत्र जन्मांध होता ह्मणून ह्मणतां तो हाच काय? तर त्याला आतां कसी दृष्टि आली?" त्यांनी त्यांस उत्तर दिले की: "हा आमचा पुत्र आहे आणि हा जन्मांध होता हे आह्मास ठाऊक आहे; पण त्याला आतां कसी दृष्टि आली हे आह्मास ठाऊक नाही; तो प्रौढ आहे त्याला विचारा, तो आपणाविषयी सांगेल." त्याच्या आईबापांस यहूदाांचे भय होते, ह्मणन त्यांनी असे झटले, कारण हा खास्त असे जर कोणी पत्करील तर त्याला सभेतून घालवावे, असा यहदाांनी एकोपा केला होता.