पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १२९] कनानी बायको आणि बहिरा व मुका. २६९ दया कर, माझी कन्या भुतापासून भारी पीडा पावत आहे." पण त्याने तिला कांहींच उत्तर दिले नाही. तेव्हां त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली की: "ती आमच्या मागे ओरडती, ह्मणून तिला निरोप दे." त्याने उत्तर दिलें की: "मला केवळ इस्राएलाच्या घराण्याच्या हरपलेल्या मेंढरांकडे पाठविले आहे" *). तेव्हां ती येऊन त्याच्या पायां पडून बोलली: “हे प्रभू, माझें सहाय कर.” त्याने उत्तर दिलेः "लैकरांची भाकर घेऊन कुत- न्यांस घालणे हे ठीक नव्हे' + ). तिने झटले : "खरे प्रभू! तरी कुतरीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात." तेव्हां येशूने तिला मटले: “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो!" आणि स्याच घटकेस तिची कन्या बरी झाली.

  • ) पचीवर असतां खोरताचें काम इस्राएल लोक (कराराचे लोक) यांमध्ये असावे

हे योग्य होते. प्रभु येशू खीस्ताचे मरण व त्याचे फिरून उठणे याकडून तारणाची सिद्धता व्हावी, आणि तेणेंकरून मात्र त्याच्या कामाचे फळ (तारण) विदेशी लोकांसही प्राप्त व्हावें. परंतु आपले मन ताठर आहे याविषयीं लज्जा पावून आवेश यावा, म्हणून जुन्या करा- संतोल भविष्यवादी कधी कधी आपला नेम सोडून विदेशी लोकांमध्ये काम करीत असत (प्रक०८० क० १) तसें प्रभु खीस्तानेही केले आहे. +) या विनवणी करणा-या बायकोवरोवर येशूचे भाषण कठोर दिसते, परंतु त्याचा हेतु इतकाच होता की, तिची नम्रता व तिचा विश्वास स्पष्ट दिसून यावा. २. नंतर येशू गालिलाच्या समुद्राकडे माघारा आला. तेव्हां कोणी एका बहिन्या तोतयाला त्याकडे आणले, आणि आपण त्याजवर हात ठेवावा ह्मणून त्याला विनंती केली. मग त्याने आपली बोटे त्याच्या कानांत घातली, आणि तो धुंकून त्याच्या जिभेला शिवला, मग आकाशा- कडे वर पाहून तो कण्हला व त्याला ह्मणाला : “एफ्फाथा!" ह्मणजे "मोकळे हो!" लागलेच त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद सुटला व तो नीट बोलू लागला. तेव्हां हे कोणाला कळवू नये असे त्याने त्यांस निषण सांगितले, पण तो त्यांस जसजसे सांगत होता तसे ते अधिकच गाजवू लागले *).

  • लोकांनी वेळेपूर्वी आपणास मशहा राजा असें ह्मणवून प्रसिद्ध करूं नये, झणन

येशू वारंवार असी आज्ञा देत असे.