पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ कनानी बायको आणि बहिरा व मुका. प्रक० १२९ वंत अन्नासाठीं श्रम करूं नका, तर सर्वकालच्या जीवनासाठी टिकणारे अन्न यासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुह्मास देईल. जीवनाची भाकर मी आहे. जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही, आणि जो मजवर विश्वासतो त्याला कधीही तहान लागणार नाहीं; या भाकरींतून कोणी खाले तर तो सर्वकाळ वाचेल. आणि जी भाकर मी देईन ती माझें मांस आहे, ते जगाच्या जीवनासाठी मी देईन.” हे ऐकून यहूद्यांनी आपणांमध्ये असा वादविवाद केला की: "हा आपले मांस आह्मास खायास कसे देईल?" तेव्हां येशूने त्यांस मटले: "मी तुह्मास खचीत सांगतो, तुह्मी मनुष्याच्या पुत्राचे मांस खाले नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुह्मामध्ये जीवन नाही. जो माझें मांस खातो व माझें रक्त पितो त्याला सर्वकालचे जीवन आहे, आणि शेवटल्या दिवसी मी त्याला उठवीन. कारण माझें मांस खाणे आहे खरे व माझे रक्त पिणे आहे खरे. जो माझें मांस खातो व माझे रक्त पितो तो मजमध्ये राहतो व मी त्याज- मध्ये" *). त्यावर त्याच्या शिष्यांतील बहुतांनी ऐकून मटले: "ही गोष्ट कठीण आहे, ही कोणाच्याने ऐकवेल?" त्या कालापासून त्याच्या शिष्यांतील बहुत मागे निघून गेले आणि त्यापुढे त्याबरोबर चालले नाहीत,ह्मणून येशू बारा जणांस ह्मणालाः "तुझीही निघून जायाला पाहतां काय?" शिमोन पेतराने उत्तर दिलेः "हे प्रभू, आह्मी कोणाकडे जाऊं? सर्वकालच्या जीवनाची वचनें तुझ्याजवळ आहेत, आणि तूं खीस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस, असा आमी विश्वास धरिला आणि जाणले आहे."

  • ) भावभक्तीने आपण सर्वदां खीस्ताचे विभागी झाले पाहिजे, परंतु खीस्ताचे जें

जीवन त्याचे मांस व रक्त यांकडून मिळवायाचे आहे, ते विशेषेकरून पर्तेपणी व खरोखर मभूभोजनाच्या संस्काराकडून विश्वासणा-यांस प्राप्त होने (मक० १५२ क. पाहा.) प्रक० १२२. कनानी बायको आणि बहिरा व मका. (माथी १५. मार्क ७.) १. मग येशू तेथून उठून सोर व सिदोन यांच्या प्रांतांत गेला आणि कोणांस कळू नये असे त्याच्या मनांत होते, परंतु कोणी एक कनानी बायको होती तिच्या लहान कन्येस अशुद्ध आत्मा लागला होता, ती त्याजविषयीं ऐकून याकडे येऊन ओरडत ह्मणाली: “हे प्रभू, दावीदाच्या पुत्रा, मजवर