पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भक० १२८] जीवनाची भाकर. २६७ त्या इतक्यांस काय?" तेव्हां येशू बोलला: "लोकांस बसवा." तेव्हां पुरुष संख्येने सुमारे ५००० पंक्तीने पन्नास पन्नास असे बसले. मग येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आशीर्वाद मागून शिष्यांजवळ दिल्या व शिष्यांनी बस- णान्यांस वांटून दिल्या. आणि त्या मासोळ्यांतूनही त्यांस पाहिजे तितकें दिले. तेव्हां सर्व जेवून तृप्त झाले. मग येशूने शिष्यांस सांगितले "कांहीं फुकट जाऊं नये ह्मणून उरलेले तुकडे गोळा करा." तेव्हां त्यांनी गोळा करून तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या. २. यावरून जो चमत्कार येशूने केला तो त्या मनुष्यांनी पाहून मटले की, "जो जगांत येणारा भविष्यवादी तो निश्चयें हाच आहे." तर आप- णाला राजा करण्याकरितां ते येणार आहेत, हे जाणून येशू डोंगरावर एकटाच निघून गेला. मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समद्राकडे आले, आणि तारवांत बसून कपरणाहूमास जाऊ लागले. इत- क्यांत अंधार पडला, आणि येशू त्यांजवळ आला नव्हता. आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळला. तेव्हां सुमारे रात्रीच्या चौथ्या प्रहरी येश ममदाबर चालन त्यांकडे आला. तेव्हां त्याला समुद्रावर चालतांना पाहन ते फार घाबरले, आणि "भूत आहे" असे समजून ओर डूं लागले. तेव्हांच तो त्यांसी बोलू लागला व त्यांस ह्मणालाः "धीर धरा, मी आहे, भिऊ नका." तेव्हां पेतराने झटले. "हे प्रभू, तूं असलास तर पाण्यावरून तजकडे यायास मला सांग." येशूने सांगितले: “ये!" तेव्हां पेतर येशूकडे जायास तारवांतून उतरून पाण्यावर चालला, पण वारा मोठा असे पाहन तो भ्याला, आणि बुडूं लागल्यावर ओरडत बोललाः"हे प्रभू, मला तार?"तेव्हां- च येशने हात लांबवून त्याला धरिले व मटलेः “अल्पविश्वासी, वा संशय कां धरिला?" आणि ते तारवांत बसल्यानंतर वारा राहिला. मग तारवांतील माणसे येऊन त्याच्या पायां पडून ह्मणाली "तूं देवाचा पुत्र आहेस खरा." प्रक०१2८. जीवनाची भाकर. (योह० ६.) दुसऱ्या दिवसी लोकांचे समुदाय येशूचा शोध करीत कपरणाहमांत आले. मग तो त्यांस समुद्राच्या पलिकडे सांपडल्यावर ते त्याला ह्मणाले: "गुरू, एथ कहा एथे केव्हां आलास?" येशूने त्यांस उत्तर दिलैः “मी तुह्मास खचीत सांगतो, तुह्मी भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करतां, नाश-