पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ पांच हजार मनुष्यांचे पोषण. पतरावर वादळाचा प्रसंग. [प्रक०१२७ २. मग हेरोदाने आपल्या जन्मदिवसी आपले प्रधान व सरदार व गालिलांतील मोठमोठे लोक यांस जेवणावळ केली. तेव्हां हेरोदियेच्या कन्येने आंत येऊन नाच केला, आणि हेरोदाला व त्याबरोबर बसणान्यांस संतोषविले. त्यावरून राजाने मुलगीला मटले : "तुला जे कांहीं पाहिजे ते मजजवळ माग ह्मणजे मी तुला देईन." आणि तो तिला शपथ वाहून बोलला : "माझ्या अर्ध राज्यपर्यंत जे कांहीं तूं मजजवळ मागसील ते तुला देईन." मग ती बाहेर जाऊन आपल्या आईला ह्मणालीः "मी काय मागू?" तिने सांगितले : "बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर माग." तिने तेव्हांच घाईने आंत राजाकडे येऊन मागितले की, "बाप्तिस्मा करणारा योहान्न याचे शीर त्वा तबकांत घालून मला आतांच द्यावे हे मला पाहिजे." तेव्हां राजा फार खिन्न झाला, तथापि शपथेमुळे व संगतीं बसणान्यांमुळे तिला त्याच्याने नाही ह्मणवेना. आणि लागलेच राजाने शिपाई पाठवून त्याचे शीर आणायास आज्ञा केली. मग त्यांनी बंदीशाळेत जाऊन त्याचे शीर तोडले आणि ते तबकांत घालून आणून त्या मुलगीला दिले, मग मुलगीने ते आपल्या आईला दिले. नंतर हे ऐकून योहान्नाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे धड उचलून नेऊन थड्यांत ठेविलें. प्रक० १2७, पांच हजार मनुष्यांचे पोषण. पेतरावर वादळाचा प्रसंग. (मात्थी १४. मार्क ६. लूका ९. योह० ६.) १. त्यानंतर येशू समुद्राच्या पलिकडे रानांतील जागेत एकिकडे गेला; तरी लोकांचा समुदाय नगरांतून तिकडे पायीं चालला. मग येशू बाहेर येऊन तो मोठा समुदाय पाहून त्यांविषयी कळवळला. कारण ज्या मेंढ- रांस मेंढपाळ नाहीं त्यांसारखे ते होते. तेव्हां तो त्यांस बहुत उपदेश करूं लागला. मग संध्याकाळी त्याचे शिष्य त्याकडे येऊन ह्मणाले : "ही रानांतली जागा आहे, आणि आतां वेळ होऊन गेली आहे. त्यांनी गांव- खेड्यांमध्ये जाऊन आपापल्याकरितां खायास विकत घ्यावे ह्मणून समुदा- पास निरोप दे." येशू ह्मणाला “तुह्मी त्यांस खायास द्या." ते ह्मणाले : "पांच भाकरी व दोन मासे यांखेरीज आह्माजवळ एथे काही नाही, परंतु